सुहास रोकडे (पोलिस उपनिरीक्षक, रांजणगाव गणपती)
Career News शिरूर : स्पर्धा परिक्षा देत असताना त्याची पुर्ण माहिती तुम्हाला माहिती गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. (Career News) त्यासाठी तुम्हाला पदवी परिक्षा पास होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्हाला पहिली ते दहावीची परिक्षाची तयारी असणे गरजेचे आहे. (Career News) त्यासाठी प्राथमिक शाळेत घेतलेले पायाभूत शिक्षण महत्वाचे ठरते. (Career News)
अनेकवेळा विद्यार्थ्यांना फक्त पास होण्याची संस्कृती रूचते. त्यासाठी वरच्या वर्गात घातला हा शेरा नसायला पाहिजे. कारण पायाभूत शिक्षण स्पर्धात्मक परिक्षांसाठी महत्वाचे आहे. इतीहास, नागरिकशास्त्र, मराठी, गणित, समाजशास्त्र इंग्रजी यासारख्या विषयातून गुण मिळवत असतात. आज तुम्ही दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन मी अधिकारी होईल हे शक्य नाही. अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परिक्षांमध्ये पदाची माहिती असणे गरजेचे आहे.
दहावी व बारावीच्या शिक्षणानंतर ध्येय निश्चित करा. त्यातून तुम्हाला अभ्यास कसा करावयाचा व माहिती कशी मिळवायची हे शिकणे गरजेचे आहे. परिश्रम केल्याशिवाय कोणतेही ध्येय गाठता येत नाही. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही एखादे पद काढण्यासाठी अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला त्यातील येणाऱ्या अडचणी समजून येतील. समस्यांतून मार्गक्रमण करा योग्य मार्गाने जिद्दिने ध्येय निश्चित करण्याचे ठरवा. तरच तुम्हाला करियर घडवून योग्य अधिकारी बनण्याचे मार्ग सापडतील.
स्पर्धा परिक्षांसाठी अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो. हे सांगणे चुकिचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये न्युनगंड तयार होतो. प्रश्नप्रत्रीका कशी असेल व परिक्षकाला आपल्याकडून काय अपेक्षीत आहे. हे तुम्हाला ज्यावेळी कळेल त्यावेळी तुम्ही योग्य मार्गावर आहात. हे लक्षात ठेवा. वेळेचे महत्व समजून घ्या. वेळेचे नियोजन करा. जे वाचन, मनन अभ्यासाल ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे.
दिवसेदिवस स्पर्धा परिक्षा अवघड होत चालल्या आहेत. बदलणारी धोरण व विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत देखील आपल स्वतः चे नियोजन महत्वाचे आहे. कुटूंबातील पाठबळ व करियर करताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. इंटरनेट हे तुमचे गुरू बनत चालले आहे. त्याचा योग्य वापर होणे अपेक्षीत आहे. तसे घडत नसेल तर विनाकारण मोबाईल मध्ये तुमचा वेळ वाया घालू नका. यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन सल्ला घ्या. तुमचे करियर तुम्हीच घडवू शकता.
शब्दांकन : युनूस तांबोळी