Bullock Cart Race : पुणे : बैलगाडा शर्यतीवर सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यात चांगलाच थरार पाहयला मिळणार आहे. (The thrill of the bullock cart race! Bhirrrrr in Indapur after the court verdict..)
न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच इंदापुरात शर्यती
सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केल्याने आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Bullock Cart Race) यानंतर आता इंदापुरात प्रथमच बैलगाडा शर्यत रंगल्या. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात या शर्यत झाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बैलगाडा शर्यतीचा थरार पार पडला. (Bullock Cart Race) यात सोलापूर, पुणे, सांगली, सातारा येथून 113 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. बैलगाडा शर्यतीचा हा थरार पाहण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी अलोट गर्दी केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur APMC News : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने ; फटाके फोडून जल्लोष
Indapur Subway | गोखळीच्या भुयारी मार्गावर सकारात्मक निर्णय घेणार : हर्षवर्धन पाटील