Breaking News : पुणे : वडिलांनी काम करण्याचा सल्ला दिल्याच्या रागातुन मुलाचा आई-वडिलांवर कात्रीने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. या खुनी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
वडिलांचा मृत्यू तर आई गंभीर जखमी
लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Breaking News) याप्रकरणी आरोपीचा मामा बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवनाथ हा काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सल्ला दिला होता. (Breaking News) मात्र आरोपी शिवनाथने वडील लक्ष्मण हे मध्यरात्री दीडच्या सुमारास झोपेत असताना, घरातील कात्रीने वडिलांच्या छाती आणि पोटावर वार केले.
दरम्यान, पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची आई झोपेतून जागी झाली. आईने भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्ती केली असता, आरोपी शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. (Breaking News) या हल्ल्यात लक्ष्मण यांचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली.
याप्रकरणी बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी शिवनाथ मंजुळे याला अटक केली आहे. (Breaking News) पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : पुण्यासह राज्यातील ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित; महारेराचा दणका