न्हावरे(पुणे): न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर साठेवस्ती जवळ मालवाहू कंटेनर व कारगाडी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
आज रविवारी(दि. 23)रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला.

मृतांमध्ये न्हावरे येथील बाप-लेकीचा व मामाचा समावेश आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. संबंधित अपघात हा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला. घटनेनंतर कंटेनर चालक पळून गेला आहे.

घटनेचा पुढील तपास न्हावरे पोलिस करत आहेत. मृतांना शवविच्छेदनासाठी न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.








