Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 7 September 2026, 12:54

आदित्य बोराटे

पुणे: धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकचे नामकरण करावे, मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशा विविध मागण्या धनगर समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले.

हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित कनेक्टिंग लिंकचे नामकरण करण्याची मागणी यापूर्वीपासून करण्यात येत आहे. या मागणीसंदर्भात विविध स्तरांवर पाठपुरावा झाला असून शासनानेही त्याची दखल घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नामकरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत अधिसूचना तातडीने काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव व्हावा, या भावनेतून मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोककल्याणकारी राज्यकारभार, सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि जनहितासाठी अहिल्यादेवींनी केलेल्या कार्याचे स्मरण आणि सन्मान म्हणून हे नामकरण करण्यात यावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

 

बाळूमामा देवस्थानच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

दरम्यान, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत कथित गैरव्यवहार व अनियमिततेचे आरोप झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांचा विश्वास कायम राहण्यासाठी प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध उच्चस्तरीय चौकशी एसआयटीमार्फत करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांचे स्पेशल ऑडिट किंवा फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, श्री करवीर निवासिनी अंबामाता महालक्ष्मी देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा किंवा पंढरपूर व शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर सक्षम, पारदर्शक आणि भाविककेंद्रित देवस्थान कायदा करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

श्रद्धा, सामाजिक अस्मिता आणि ऐतिहासिक वारशाशी निगडित या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. विविध मागण्यांबाबत तातडीने प्रशासकीय कार्यवाही करून शासनस्तरावर निर्णय घेण्याची मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03
Next Post

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp