लोणी काळभोर (पुणे) : य़शवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोरतापवाडी, नायगाव व कोरेगाव मुळ या गट क्रमाक दोनमधील “शेतकरी विकास आघाडी” चे शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी व ताराचंद साहेबराव कोलते तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर रयत सहकारी पॅनेलच्या राजेंद्र रतन चौधरी, मारुती सिताराम चौधरी, लोकेश विलास कानकाटे या तीनही उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी” या पॅनेलने जाहीर झालेल्या दोन गटातील सहाही जागा जिंकत, कारखान्यावर एकहाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. तर या निवडणुकीत हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल” मोठा पराभाव स्विकारावा लागणार असल्याटी चिन्हे दिसुन येत आहेत.
दरम्यान, उरुळी कांचन शिंदवणे या गट क्रमांक 1 मधून “शेतकरी विकास आघाडी” चे संतोष आबासाहेब कांचन यांना सर्वाधिक ५६७० मत् मिळाली असुन, त्यांच्या खालोखाल सुनिल सुभाष कांचन (५४९६) तर याच पॅनलचे तीसरे उमेदवार सुशांत सुनिल दरेकर हे (५०८०) एवढी मते मिळवून विजयी झाले आहेत. आहेत. तर दुसरीकडे पराभुत उमेदवारांच्या पैकी विकास विलास आतकिरे यांना सर्वाधिक ४८६५ तर दुसरे पराभुत अजिंक्य महादेव कांचन यांना ४४९७ मते तर तिसरे उमेदवार अमित भाऊसाहेब कांचन यांना ४१९६ एवढी मते मिळाली आहेत.