उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत विजयादशमीच्या निमित्ताने सीमोल्लंघन करत असताना एकाने भरदिवसा गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार घडू कसा शकतो, यावरून नागरिक संतप्त आहेत. दोन पिस्तुलांचे पूजन करून हवेत गोळीबाराचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांकडे अधिकृत तक्रार पोहोचली नसल्याचे समोर आले. त्यामुळे “महाराष्ट्राचा बिहार झाला का?” असा सवाल नागरिक सोशल मीडियावर जोरदारपणे उपस्थित करत आहेत.


दरम्यान, वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात







