पुणे: आसाममधील एका महिलेला बॉयफ्रेंडने विवाहाचे आमिष दाखवून धक्कादायक कृत्य केल्याची घटना पुण्यात घडली आहे. विवाहाचे आमिष दाखवून प्रियकराने चक्क 5 लाखात महिलेला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, डीबी पोलिसाला माहिती दिली असता पोलिसाने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला. दरम्यान, या प्रकरणी कुंटणखाना चालकासह आणखी चार आरोपींविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लग्नाचे आणि चांगल्या आयुष्याचे स्वप्न रंगवलेल्या तरुणीसोबत हि धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करुन एका महिलेला अटक केली आहे.
धर्मरक्षक दल, राजाराम प्रतिष्ठान, संजिवनी फाउंडेशनने पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केल्यानंतर आरोपी डीबी पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी बॉयफ्रेंड शफीऊल आबूल वाहिद आलम (२८), पापा शेख, अधुरा शिवा कामली आणि डीबी पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे पोलिसांनी वेश्यालय मालक आणि डिटेक्शन ब्रांच (डीबी) मधील एका पोलिस अधिकाऱ्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यांनी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तरुणाने विकल्यानंतर मागील 4 महिन्यांपासून तरुणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.
जाणून घ्या, संपूर्ण प्रकार
महिला ही मुळची आसाम येथील असून 2018 साली तिचा विवाह झाला होता तिला एक 6 वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, महिलाचा पती भाजी विक्रेत्या असून तो महिलेला मारहाण करत असे दरम्यान, महिलेला आरोपी भेटला आणि त्याने तिला लग्नाचे आमिष देऊन पुण्याला आणले आणि कुंटणखाना चालकाला विकले. डीबी पोलिसांना मीहिती दिली असता त्यांनीही वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. महिलेला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले. घडला प्रकार सांगितल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली, चौकशी करून कुंटणखानातून महिलेची सुटका केली. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोलीस निरीक्षक अजित जाधव तपास करीत आहेत.