सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला असून, त्या ठिकाणी काही महिन्यापासून विमानतळ परिसरातील गावात बोगस मागणीचे प्रकार उघडकीस येत आहेत, एजंट व बनावट वारसदारांचा पुरंदर मध्ये सुळसुळाट चांगलाच झाला आहे. पुरंदर तालुक्यात बोगस सातबाराचे शासन दरबारी नोंद कशा प्रकारे होते, याचा प्रश्न सर्वसामान्य माणसांना तर पडला आहेच, परंतु बनावट कागदपत्रात च्या आधारे खरेदीदाराचे नाव सातबारा, उताऱ्यावर लावण्याचे प्रताप तर या दलालानी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून, एक प्रकारे उजेडात आले आहेत.
पुरंदर तालुक्यात विमानतळ होत असलेल्या गावांमधील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, पारगाव या गावातील हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहेत. फसवणूक कशी होते, बनावट सातबारा, उतारे व मालकी हक्क दाखवणे, जिथे जमीन खरोखर त्यांच्या नावे नसते, पण बनावट कागदपत्रांनी ती आपली भासवतात, मृत व्यक्तीच्या नावे जमीन विकणे, मृत व्यक्तींच्या नावावरील जमीन त्यांच्या वारसदारांची परवाना न घेता विकली जाते, एका जमिनीचे अनेक व्यवहार, एका जमिनीची एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी व्यक्तींना विक्री केली जाते, सरकारी किंवा वादग्रस्त जमीन विकणे, अशी जमीन विकत घेतल्यावर खरेदीदार अडचणीत येतो, कारण ती मालकी स्पष्ट नसते.
बनावट खाते व बनावट वारस तयार करणे, वारसा हक्काच्या खोट्या कागदपत्राची निर्मिती करून जमीन विकणे,दहा लाखापासून ते करोडोपयॅत भूखंडाची ऑफर दिल्याने, नवीन गुंतवणूकदार त्यात फसत असल्याचे दिसत आहे. चक्क शासकीय अधिकाऱ्यांलाच फसवणयाचा प्रकार पुरंदर तालुक्यात घडून आलेला आहे. हे समोर वास्तव्य दिसून येत आहे. कमी किमतीमध्ये खरेदीदारांना भूखंड देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. गुंतवणूकदारांनी याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे. पुरंदर विमानतळाच्या परिसरामध्ये बोगस जमीन खरेदी विक्री करण्याचे रॅकेट सक्रिय असून, या बोगस रॅकेट चक्क शासकीय अधिकाऱ्यांचीच फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
काळजी कशी घेतली पाहिजे
जमीन खरेदी पूर्वी सातबारा, आठ- अ, फेरफार, घरफार, सिटी सर्वे, प्रॉपर्टी कार्ड, याची खातर जमा करावी, तालुका कार्यालय व महसूल विभागात कागदपत्राची छाननी केली पाहिजे, वकिलामार्फत टायटल क्लियरन्स रिपोर्ट घ्यावा, जमीन विकत घेण्याआधी एडवोकेट किंवा प्रॉपर्टी कन्सल्टंट कडून सखोल चौकशी केली पाहिजे, ई गव्हर्नर्स पोर्टल्स जशे की महाराष्ट्राचे महाभुलेख वरून डिजिटल नोंद तपासली पाहिजे, व्यवहार करताना नोंदणीकृत दसतऐवज व पॅन/ आधार तपशील बघितला पाहिजे.
पुरंदर विमानतळ परिसरामध्ये सात गावामध्ये काही दिवसापासून बोगस दस्तऐवज हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत, बाहेरील नागरिक जमीन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. यावेळी् त्याची फसवणूक होत आहे. त्यासाठी कोणाचाही प्लॉट कोणालाही विकला जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. चुकीचे खरेदीखत करताना अधिकार्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजेत. महेश राऊत, माहिती अधिकार कार्यकर्ते.
जमिनीचे खोटे दस्तऐवजचे पुरंदर तालुक्यात जे झाले आहेत, त्या बाबतीमध्ये त्यांना नोटीस काढण्यात येणार आहे. व त्यांचा जबाब घेऊन, आधार कार्डची पडताळणी केली जाईल. व त्या ठिकाणी दस्त नोंदवणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. रवींद्र फुलपगारे, दुय्यम निबंधक पुरंदर