उरुळी कांचन, (पुणे) : “रक्तदान ही काळाची गरज असून, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या उद्देशाने आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. एकाने रक्तदान केले तर तीन जणांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे रक्तदान हे जीवदान आहे”, असे अल्ट्राटेक प्लांट लॉजेस्टिकचे हेड मधुकर सांगा यांनी सांगितले.
नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अल्ट्राटेक सिमेंट पुणे बल्क टर्मिनल पुणे आणि लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या तर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ७७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अल्ट्राटेक प्लांट लॉजेस्टिकचे हेड मधुकर सांगा, त्यांचे सहकारी इम्रान मन्सुरी, सीमा शर्मा, स्नेहा सुरसे, मुस्कान श्रीवल्ली, शांताराम पवार, रोहित यादव, अनिल वाघमारे, हेमंत कळसकर, विश्वराज हॉस्पिटल तर्पण रक्तपेढीचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे, डॉ. ऋषिकेश, त्यांचे सहकारी विकास, मंजीत रजवाडे आदी उपस्थित होते.