पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी २२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने, तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील कांबळे, खडकवासला मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे, तर सोलापूर शहर मध्य मतदार संघातून देवेंद्र कोठे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
भाजपची दुसरी यादी जाहीर
- राम भदाणे- धुळे ग्रामीण
- चैनसुख संचेती – मलकापूर
- प्रकाश भारसाखळे – अकोट
- विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
- श्याम खोडे – वाशिम
- केवलराम काळे – मेळघाट
- मिलिंद नरोटे – गडचिरोली
- देवराम भोंगले – राजुरा
- कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
- करण देवताळे – वरोरा
- देवयानी फरांदे – नाशिक मध्य
- हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
- कुमार आयलानी – उल्हासनगर
- रवींद्र पाटील – पेण
- भीमराव तापकीर – खडकवासला
- सुनील कांबळे – पुणे कॅन्टोन्मेंट
- हेमंत रासने – कसबा पेठ
- रमेश कराड – लातूर ग्रामीण
- देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
- समाधान आवताडे – पंढरपूर
- सत्यजित देशमुख – शिराळा
- गोपीचंद पडळकर – जत