केडगाव : दौंड तालुक्यातील खुटबाव गावच्या हद्दीत यवत खुटबाव मार्गावर चारचाकी व दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात खुटबाव गावच्या हद्दीत (भेलके वस्ती) चार मे रोजी दुपारी ४ .१५ मिनिटांच्या दरम्यान घडला आहे. यात गुलाब धुळाजी टूले (वय ६५ रा. एकेरीवाडी ता.दौंड ) ही व्यक्ती (गाडी न. एम एस १२ डी पी४९९५) जागीच ठार झाली आहे.
गुलाब टूले हे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान मुलगा नितीन टुले सह दुचाकी खरेदी करण्यासाठी हडपसर येथे गेले होते. दुचाकी खरेदी केल्यानंतर हे दोघे घरी परत निघाले. बेबी कॅनाल येथे खुटबाव कडून यवत कडे जाणाऱ्या स्विफ्ट कार एम एच ४२ बी बी ५७४९ चालक पांडुरंग कापरे रा. पिंपळगाव ता. दौंड ने समोरील गाडीला ओव्हर टेक करत असताना समोरून येणारे दुचाकीस्वार गुलाब टूले यांना जोरदार धडक दिली.
यामध्ये गुलाब टूले हे जखमी होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना इतरांनी यवत ग्रामीण रुग्णालय येथे उपचारकामी नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अपघात झाल्याचे समजताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताबाबत माहिती घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्वतःला नवीन गाडी घेण्यासाठी गेले पण गाडीसह माघारी नाही आले..
स्वतःला गाडी घेण्यासाठी वडील आणि मुलगा हडपसरला गेले होते. गाडी घेतली आणि वडील नवीन गाडी घेऊन चालवत खुटबाव म्हणजे घरापासून जेमतेम तीन कि. मी. अंतरावर आले आणि तितक्यात अपघात झाला. यात वडीलही गेले आणि नवीन गाडीचा ही चुराडा झाला. ही गोष्ट ग्रामस्थांना समजताच सर्वांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.