Chandrashekhar Bawankule : पुणे : देशातील १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच व्हावेत, अशी तमाम जनतेची भावना आहे. कारण भाजप म्हणजेच महाराष्ट्राचा विकास, हिंदू संस्कृतीचे रक्षण, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्याचा मार्ग आणि देश, राष्ट्राचे कल्याण… याची जाणीव जनतेला आहे. आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नारायणगाव येथील सभेत केले.
‘लोकसभा महाविजय २०२४’ प्रवास दौरा तसेच घर चलो अभियानाअंतर्गत आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नारायणगाव येथे सभा झाली. यावेळी बावनकुळे बोलत होते.
या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, जयश्री पलांडे, संतोष खैरे, भगवान घोलप, पुणे जिल्हा सचिव आशीष माळवदकर, सरपंच राजेंद्र मेहेर, ऍड. राजेंद्र कोल्हे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, “अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात पहिला हार मी घालेन, असे सुप्रिया सुळे यांनी नुकतेच म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात भाऊ-बहिणीचे नाते आहेत. परंतु सुळे जे बोलल्या ते खरोखरच मनापासून बोलल्या आहेत का, याची शहानिशा करा. अजित पवार यांना अंडर इस्टीमेट करण्यासाठीच सुप्रिया सुळे यांनी असे वक्तव्य केले असणार, हे जनतेला माहित आहे.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेईल
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार यांनी अनेक प्रयत्न केले. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, हे आम्हाला त्यांच्याच निकटवर्तीयांनी सांगितले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या रथाची घौडदौड सुरु आहे. हा रथ थांबवण्यासाठी शरद पवार यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. शरद पवार व उद्धव ठाकरे हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करतात. त्यांना हे मान्य आहे का? असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व गहाण ठेवले आहे. मी मुख्यमंत्री व माझा मुलगा मंत्री ही त्यांची भूमिका आहे.
मुख्यमंत्री कोण असणार? या प्रश्नावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सहाजिकच आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे असेच आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वाटते. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील, असे वाटते. यामध्ये चुकीचे काहीच नाही. मात्र, पुढील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेईल. बोर्ड ठरवेल तोच मुख्यमंत्री होईल.
भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील म्हणाले, “पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार, पुढील ध्येय धोरण, केलेली कामे व राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेला सांगाव्यात. कोणत्याही पक्षाचा नाही त्या व्यक्तीला पक्षाशी जोडणे महत्वाचे काम कार्यकर्त्यांनी करावे. भविष्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा पक्षाचे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
कार्यक्रमाचे नियोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, आशा बुचके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले. आभार शरद दरेकर यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : बनावट कंपनी काढून, गुंतवणूकदारांची १०० कोटींची फसवणूक ईडी ;चे कात्रजमध्ये छापे
Big Breaking News : केडगाव येथील उपलेखापरीक्षकाला साडेआठ हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले