Big Breaking News : पुणे : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वसामान्यच नाही, तर उच्चशिक्षित लोकही भरडले जात असल्याची धक्कादायक माहितीसमोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या भामट्यांनी राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. आता लोकप्रतिनिधीही त्यांच्या रडारवर आले आहेत. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांचे फेसबुक अकाउंट क्लोन करण्याची करामत सायबर भामट्यांनी केली.
ओटीपी घेऊन तर कधी मोबाईल हॅक करुन सायबर भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जाते. दरवेळी ते चोरीसाठी नवनवीन शक्कल राबवत असतात. आता तर त्यांनी कमालच केली आहे. (Big Breaking News) आमदार भीमराव तापकीर यांचे बनावट फेसबुक अकाउंट चोरट्यांनी तयार केले. त्यानंतर त्यांनी अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्या माध्यमातून अनेकांकडे पैशांची मागणी केली जात होती.
अनेकांकडे केली पैशांची मागणी
दरम्यान, रिक्वेस्ट प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधींकडून आलेली असल्यामुळे अनेक जण ती स्वीकरत होते. परंतु त्यानंतर वेगळाच प्रकार समोर आला. एका सामाजिक कार्यकर्त्याने फेसबुकवरुन तापकीर यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्याशी मेसेंजरवरून संपर्क साधण्यात आला. त्यांचा मोबाईल नंबर घेऊन, त्यांना जुने फर्निचर विकण्याबाबतची माहिती देण्यात आली. (Big Breaking News) सीआरपीएफमधील अधिकारी सुमित कुमार यांची बदली झाली आहे. त्यांच्याकडे घरगुती वापराचे जुने फर्निचर आहे. ते त्यांना विकायचे आहे. कोणाला पाहिजे असल्यास सांगा, असे फोनद्वारे सांगण्यात आले.
अशा प्रकारच्या फोनबद्दल संबंधित सामजिक कार्यकर्त्याना थोडीफार माहिती असल्याने, या घटनेची त्यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी थेट भीमराव तापकीर यांना फोन केला. (Big Breaking News) त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आपण फेसबुकवरुन अशी रिक्वेस्ट पाठवली नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर प्रकार उघड झाला.
या घटनेनंतर तपास केला असता, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
BIG BREAKING NEWS : अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीच्या तब्बल ३५ मुलांना मारहाण