Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : मानवकल्याणाच्या गोष्टी भारतीय म्हणून स्वीकारा – – भन्ते राजरत्न

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 October 2023, 12:36

प्रदीप गांधलीकर
Pimpari News : पिंपरी, ता.१० : “धार्मिक तेढ टाळून धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या मानवकल्याणाच्या गोष्टी भारतीय म्हणून स्वीकारा!” असे विचार भन्ते राजरत्न यांनी मांडले आहेत.

‘धम्मपद’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

पिंपरी येथील संत तुकारामनगर परिसरात असलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिरात डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक बाबा भारती अनुवादित ‘धम्मपद’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन भन्ते राजरत्न यांच्या हस्ते सोमवारी (ता.०९) करण्यात आले. यावेळी बोलताना, भन्ते राजरत्न यांनी वरील विचार मांडले. यावेळी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लोकसाहित्यातील विविध संदर्भ उद्धृत करीत काव्यमय शैलीतून अशोक शीलवंत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जयंत पाटील यांनी, “हिंसेचे क्रौर्य रूप पाहून आम्ही शिक्षणाचे संस्कार रुजविण्यात कमी पडलो!” अशी खंत व्यक्त केली; तर संजय आवटे यांनी, “बुद्धाच्या वाटेवर जाण्याशिवाय पर्याय नाही. सद्य:स्थितीत साहित्यिकांनी आपली स्वतःची भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे!” असे मत मांडले.

दरम्यान, ज्ञान, कारुण्य, दया अन् प्रेमाचे प्रतीक म्हणजे तथागत गौतम बुद्ध होत.‌ संपूर्ण विश्वातील मानवजातीच्या कल्याणाचा काव्यमय बुद्धविचार ‘धम्मपद’ या ग्रंथात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले त्यांचे समकालीन साहित्यिक आणि मराठी – पाली शब्दकोशकार बाबा भारती यांनी मूळ पाली भाषेत असलेल्या ४२३ धम्मपदांचा मराठीत अनुवाद केला. तत्त्वज्ञान विषयावरील या मौलिक ग्रंथाला महाराष्ट्र शासनाने संदर्भग्रंथ म्हणून स्वीकृती दिली. त्यामुळे साहजिकच अनुक्रमे १९७८ आणि २०१५ या वर्षी दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या; आणि लोकाग्रहास्तव तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.

 

यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यवाह उद्घव कानडे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, माजी नगरसेवक तुषार कामठे, मारुती भापकर, इंद्रायणी शिक्षण संस्था सचिव चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, भाऊसाहेब डोळस, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संजय आवटे, महेंद्र भारती व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शीलवंत – धर यांनी प्रास्ताविक केले. अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. राजरत्न शीलवंत आणि पदाधिकारी यांनी संयोजन केले. प्रा. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर महेंद्र भारती यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46
Next Post

Hadapsar News : हडपसर येथील इंडियन डेंटल असोसिएशनचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न ; २ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींनी घेतला सहभाग..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp