Big Breaking News : पुणे : बनावट कंपनी स्थापन करून, गुंतवणुकीचे आमिष दाखविले व राज्यभरातील गुंतवणूकदारांची तब्बल शंभर कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यातील कात्रज भागात कारवाई केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट कंपनी या बनावट कंपन्या स्थापन करून ही कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.
पाच जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी विनोद तुकाराम खुंडे, संतोष तुकाराम खुंटे, मंगेश खुंटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big Breaking News) याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी गुंतवणुकदारांना दाखविले. त्यानुसार राज्यभरातील गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये गुंतविले. आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले. (Big Breaking News) मात्र, हे पैसे कंपनीच्या खात्यात न भरता बनावट नावाने बँकेत खाते काढून ही रक्कम जमा करण्यात आली.
या घटनेतील मुख्य सूत्रधार विनोद खुंटे याने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार पाहणारी काना कॅपिटल नावाची कंपनी त्याने स्थापन केली होती. गुंतवणुकदारांना या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. काहींना मध्यस्थ म्हणून काम करण्यास आरोपींनी सांगितले होते. गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखविले होते.(Big Breaking News) त्यानंतर कंपनी बंद करून आरोपी पसार झाले.
दरम्यान, ईडीच्या पथकाने मंगळवारी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : आता आमदारांचे फेसबुक अकाउंट क्लोन; सायबर भामट्यांची करामत