जीवन सोनवणे
Bhor News : भोर : पतसंस्थेमुळे खासगी सावकारीला आळा बसला असून, छोटे व्यावसायिक व सर्वसामान्यांना पतसंस्थेचा मोठा आधार वाटत आहे, असे मत विघ्नहर्ता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांनी पतसंस्थेच्या २५ साव्या वार्षिक सभेप्रसंगी व्यक्त केले.
विघ्नहर्ता पतसंस्थेचा ६ टक्के लाभांश
भोर तालुक्याच्या पूर्व भागातील विघ्नहर्ता पतसंस्था मागील २५ वर्षे सभासदांचे विघ्न हरण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. संस्थेने कोरोना कालावधी व्यतिरिक्त सातत्याने सभासदांना लाभांश वाटप केला असून, संस्थेला यावर्षी लेखापरिक्षणामध्ये ‘अ’ वर्ग मिळाल्याचे उपाध्यक्ष प्रकाश तनपुरे यांनी सांगितले. (Bhor News) या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश तनपुरे, सचिव काळुराम महांगरे, संचालक अंकुश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, गणपत भंडलकर, उद्योजक सुनिल धाडवे, शेखर शेटे, भरत बोबडे आदी मान्यवरांसह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या ठेवी १८.२७ कोटी एवढ्या असून, कर्ज वाटप १३.२७ कोटी इतके आहे. संस्थेने ५.४४ कोटींची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल हे १. ३९ कोटी इतके आहे. संस्थेचे खेळते भांडवल २२.७९ कोटी आहे. संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला असून यावर्षी सहा टक्के लाभांश जाहीर केलेला आहे. (Bhor News) सभासदांच्या बचत खात्यावर लाभांश वर्ग करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे सचिव काळुराम महांगरे यांनी दिली.
सर्वसामान्य व्यक्तींना तसेच व्यावसायिकांना बॅंकांमधून कर्ज घेताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. विघ्नहर्ता पतसंस्था ही तातडीने कर्जपुरवठा करते. कर्जाच्या ओझ्याखाली कर्जदार दबला जाऊ नये म्हणून संस्था सरळ व्याजाने कर्जपुरवठा करते. (Bhor News) संस्थेचा उद्देश केवळ नफा कमविणे हा नसून, संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे बाठे यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव काळुराम महांगरे यांनी केले तर आभार प्रकाश तनपुरे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : भोंगवलीत शेतीपंपाच्या केबलची चोरी; चोरट्यांच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी
Bhor News : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची कापूरहोळ येथे ग्रेट भेट; कार्यकर्त्यांना सुखद धक्का