Bhima Patas factory : संदीप टूले ( दौंड ) : भिमा पाटस कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या गाळपासाठी ऊस देण्याऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केला जाणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली. ही माहिती देताच भिमा पाटस कारखान्याला ऊस देण्याऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
याआधी दौंड तालुक्यातील कोणत्याच कारखान्याने उसाचा बाजारभाव पहिला हफ्ता जाहीर केला नव्हता. तसेच भीमा पाट्स कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार राहुल कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे फक्त शेतकरी व सभासदांना आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वच ऊस शेतकरी संभ्रमावस्तेत होते. पण आता उसाच भाव जाहीर करताच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत भीमा पा टस कारखान्याला ऊस देण्यात पसंती दर्शवली आहे.
भीमा पाटस कारखान्याने ६०,००० मेट्रिक टनाचा टप्पा पार केला आहे. भिमा पाटस कारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आवाहनही आमदार राहुल कुल यांनी केले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांनी शेतकऱ्यांना व सभासदना उसाचा दर चांगला देण्याबातचा दिलेला शब्द खरा केले आहे व येणाऱ्या काळातही शेतकरी हिताचे चांगले निर्णय घेतले जातील
विकास शेलार, संचालक भिमा पाटस कारखाना