सागर जगदाळे
Bhigwan Big News : भिगवण, (पुणे) : इंदापूर तालुक्यात सधन ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या भिगवण ग्रामपंचायतीला थकबाकीचे ग्रहण लागले असून थकबाकी मिळवण्यासाठी दुकानदारांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. याबाबत एका दुकानदाराने गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.
ग्रामपंचायतीकडे उधारी थकलेले व्यापारी मारताहेत हेलपाटे
भिगवण ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक व्यापारी, दुकानदार, ठेकेदार यांच्याकडून उधार स्वरूपात साहित्य खरेदी केले होते. मागील काही दिवसांपासून या दुकानदरांची बिले हि ग्रामपंचायतीकडून दिलेली नाहीत. (Bhigwan Big News) त्यामुळे मागील थकबाकी मिळवण्यासाठी दुकानदारांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. माजी सरपंचांच्या काळातील लाखो रुपयांची उधारी न दिल्यामुळे ग्रामपंचायतीची पत ढासळत चालली आहे. तसेच काही दुकानदारांनी ग्रामपंचायतीला उधार देण्याचे बंद केल्याची चर्चा सध्या भिगवणसह परिसरात जोर धरू लागली आहे. तसेच ‘कोणी उधार देता का उधार’ म्हणण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे.
भिगवण येथील एका सिमेंट पाईप कंपनीने तर थकबाकी जमा न झाल्याने थेट इंदापूरचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी पारित केले आहेत.(Bhigwan Big News) या कंपनीची उधारी दोन लाखांपेक्षा जास्त असून मे २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या काळातील आहे. त्यामुळे ही थकबाकी ग्रामपंचायत भिगवण कशा पद्धतीने देणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, सधन ग्रामपंचायत म्हणून भिगवण ग्रामपंचायत ओळ्खली जाते पण याच ग्रामपंचायतीवर आज वाईट वेळ आली आहे. गावगाडा चालवीत असताना जमा खर्चाचा ताळमेळ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (Bhigwan Big News) परंतु तात्कालीन पदाधिकाऱ्यांना याचे भानच राहिले नसल्याने आता ग्रामपंचायतला कोणी उधार देता का उधार असे म्हणण्याची वेळ आली आहे.
याबाबत बोलताना सरपंच दिपीका क्षीरसागर म्हणाल्या, “मागील थकबाकी बाबत सिमेंट पाईप कंपनीने तक्रार दिल्याची माहिती मिळाली असून याबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही केली जाईल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हिराजी काळे यांना प्रदान
Bhigwan News : भाजपच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तेजस देवकाते यांची निवड
Bhigwan News : तरुणांच्या प्रसंगावधानामुळे कत्तलीसाठी नेणाऱ्या २५ वासरांना जीवदान!