Bhigwan News : भिगवण : दत्तकला शिक्षण संस्थेत चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलने गुरुवारी (दि.24) आनंदोत्सव साजरा केला. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेचे उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ, तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांच्या संकल्पनेतून या सुंदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद
विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रचंड प्रेम माया आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण व्हावी, तसेच दत्तकला शिक्षण संस्थेतील एखादा विद्यार्थी भारत देशाचा पुढे शास्त्रज्ञ बनावा हाच या उपक्रमाच्या मागचा हेतू होता. (Bhigwan News) आज या उपक्रमात चांद्रयान 3 मोहिमेबद्दल बरीच माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. चांद्रयानचे उड्डाण झाल्यापासून ते चंद्रावर पोहोचायला किती वेळ लागला ही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
भारतीय शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासूनच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणच्या मदतीने हे यान चंद्रावर कसे पाठवले. या चंद्रावर पाठवण्याच्या मागचा उद्देश काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चंद्रावर दक्षिण ध्रुवाकडे जाणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरला आहे.(Bhigwan News) त्याचबरोबर पृथ्वीवरून चंद्रावर हे यान कसे पोहोचलं आणि पृथ्वीवरून चंद्रावरची एक बाजू कशी दिसते हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. लँडर कुठे उतरून त्याची कामगिरी कशी असेल चंद्रावर थंड पाणी आहे का? तसेच त्या पाण्यात खनिजे आढळतात का? तेथील माती कशी आहे? ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर नंदा ताटे, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सिंधू यादव, प्राध्यापक धमेंद्र धेंडे, प्रा. खाडे हे उपस्थित होते. यावेळी चांद्रयानाची सर्व माहिती कदम व खोमणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी चांद्रयान-3 यशस्वीपणे लँड झाल्याने आनंद व्यक्त केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात शालेय साहित्य, खाऊचे वाटप
Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा सत्कार