सागर जगदाळे
Bhigvan News – भिगवण : एकविसाव्या शतकामध्ये विविध क्षेत्रामध्ये वाढलेली स्पर्धा विचारात घेता पारंपारिक शिक्षणाला कौशल्याधारित शिक्षणाची जोड देण्याची आवश्यकता आहे. (Bhigvan News) येथील कला महाविदयालयांने सुरु केलेले प्रमाणपत्र वर्ग ही विदयार्थ्यांना खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे. (Bhigvan News) विदयार्थ्यांनी पांरपारिक अभ्यासक्रमांबरोबरच ही कौशल्ये आत्मसात केल्यास स्पर्धेच्या युगात उत्तम करियरसाठी हे प्रमाणपत्र वर्ग निश्चित उपयुक्त ठरतील असा विश्वास वरवंड(ता.दौंड) येथील एकनाथ सिताराम दिवेकर महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निगडे यांनी व्यक्त केले. (Bhigvan News)
इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविदयालयांमध्ये आठ प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन
येथील इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला महाविदयालयांमध्ये आठ प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज होते. तर डॉ. प्रज्ञा लामतुरे,डॉ. प्रशांत चवरे, प्रा. पद्माकर गाडेकर, प्रा. शाम सातर्ले, प्रा. किरण गुणवरे,डॉ. सुरेंद्र शिरसट, प्रा. दशरथ कुदळे, प्रा. धनाजी मत्रे, प्रा. निलेश जाधव उपस्थित होते.
यावेळी स्पोकन इंग्लिश, व्यवहारिक मराठी, मोडी लिपी, कम्प्युटर अॅप्लिकेशन, ट्रॅव्हल अॅंड टुरिझम, योगा, ह्युमन राईटस्, बॅंकिंग अॅँड फायनान्स आदी प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. सुनिल निगडे पुढे म्हणाले, जीवन जगत असताना वेगवेगळी कौशल्य आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे असते. महाविद्यालयीन जीवनामध्ये जर आपण अधिकाधिक कौशल्य प्राप्त केली तर त्यांचा उपयोग आपल्याला पुढील आयुष्यात आयुष्यभर होणार असतो. नोकरी किंवा व्यवसायाबरोबरच आयुष्य सुंदर करण्यासाठी ही कौशल्ये उपयोगी पडतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महादेव वाळुंज म्हणाले, आयुष्यात शिकलेली कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नसते भविष्यकाळ हा आव्हानात्मक आहे आणि अशा भविष्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अशा प्रकारचे प्रमामपत्र वर्ग बौध्दिक क्षमता वाढविण्यास व आयुष्याची वाटचाल यशस्वी करण्यासाठी मदत करणार आहेत आणि म्हणून म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमीत एकतरी प्रमाणपत्र वर्ग दरवर्षी करावा.
प्रास्ताविक प्रा. पद्माकर गाडेकर यांनी केले सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigvan News : भिगवण रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम : वन्य प्राण्यांसाठी तयार केले पानवठे ..!