बारामती, (पुणे) : Baramati Sad News : कुठलेही रक्ताचे नाते नव्हते अथवा एकमेकाचे पैपाहुने अथवा भावभावकी नवह्ती.. तरीही लहाणपणीच मैत्रीची नाळ जळली.. (Baramati Sad News )जनु मैत्रीचे धागे नियतीने इतके घट्ट विनले गेले की, शेवटच्या क्षणापर्यंत हम सब साथ साथ म्हणण्यापर्यंत.. लहाणपणी न कळत एकमेकाना अंतर देणार नाही हे वचन घेणाऱ्या दोघांना नियती थोड्या अंतराने अगदी लांबच्या प्रवासाला घेऊन गेली. (Baramati Sad News )
बारामतीतील त्या दोघांची दोस्ती जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी…
घट्ट मैत्री असलेल्या जय वीरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मित्रांचा एकाच दिवशी काही तासाच्या अंतरावर मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका मित्राचा सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समजताच सायंकाळी दुसऱ्या मित्राचा ही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यात घडली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यात काम करणारे रामचंद्र किसन कोरडे व त्यांचे जिवलग मित्र अशोक गणपत होळकर या दोघांचे हृदयविकाराने निधन झाले. कारखान्यात जय-विरु या नावाने प्रसिद्ध असलेली कोरडे-होळकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामचंद्र कोरडे (वय ४९) यांचे सोमवारी (ता. १७) हृदयविकाराने निधन झाले. तर त्यांचे जिवलग मित्र अशोक होळकर यांचे त्याच दिवशी सायंकाळी हृदयविकारानेच निधन झाले आहे. रामचंद्र कोरडे हे बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते तर अशोक होळकर हे बारामती तालुक्यातील होळ (पाटीलवाडा) येथून कारखान्यात कामाला येत होते. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक होता. त्यांची जिगरी मैत्री सगळीकडे परिचित होती.
दम्यान, दोघेही सोमेश्वर कारखान्यात एकाच दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबर २००१ रोजी एकाच असिस्टंट फायरमन या पदावर रुजू झाले. त्यामुळे एकत्र काम, एकत्र जेवण, फिरायला एकत्र जाणे, सुख दुःखात एकाच वेळी सामील होणे. यामुळे त्यांची मैत्री घट्ट होत गेली. यांची मैत्री देवाला देखील आवडलेली असल्याने त्यांना एकाच वेळी आपल्याकडे बोलावून घेतल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. मित्रत्वाची नाळ नियतीने अपघातानंतरही तुटु दिली नाही. जनु जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी असा नारा देत नियतीने दोघांनाही एकाच दिवशी आपल्या बाहुपाशात घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati | दुर्दम्य इच्छा शक्ती च्या जोरावर तीन विवाहित तरुणींचे पोलिस भरतीत नेत्रदीपक यश…!
Baramati Crime : किरकोळ कारणावरून चाकूचा धाक दाखवत एका १९ वर्षीय तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण..!