Baramati News : काटेवाडी : राज्याच्या पणन संचालनालयामार्फत राज्यातील बाजार समित्यांची 2022-23 या वर्षासाठीची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये बारामती बाजार समिती आणि नाशिक जिल्ह्यातील लासलगाव यांनी संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला. गेल्या वर्षापेक्षा चांगली कामगिरी करत बारामती कृषी बाजार समितीने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
बारामती आणि लासलगाव बाजार समिती यांना संयुक्तरित्या प्रथम क्रमांक
राज्यभरातील बाजार समित्यांची बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत यंदाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली. यात राज्यातील एकूण 305 बाजार समित्या आहेत. (Baramati News) यामध्ये लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या बाजी मारली. मागील वर्षी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यामध्ये नववा तर पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, यंदा आठ स्थानांची झेप घेत बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती थेट पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण 35 निकष तयार करण्यात आले होते. यामध्ये गुण देऊन क्रमांक काढण्यात आले. (Baramati News) त्यात बारामती बाजार समिती आणि नाशिक जिल्ह्यातील लासलगाव यांनी संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामती तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले ; पायलट जखमी..
Baramati News : आई म्हणजे आई असते… मुलाला वाचविसाठी तिने केले किडनीचे दान