Baramati News : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे राज्यभर ओळखले जातात. नागरिकांना आपल्या समस्या व काम थेट अजित पवार यांच्यामार्फत करून घ्यायचे असल्यास त्याला कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसते. नागरिक त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम ते जागच्या जागीच मार्गी लावतात. याचाच प्रत्यय आज बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.
अजित पवार यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे राज्यभर ओळख
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील त्यांनी विविध सांत्वनपर आज भेटी घेतल्या. या भेटीदरम्यान शहरातील आमराई परिसराला भेट दिली. यावेळी शहरातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या मार्गी लावल्या. यावेळी एका मागासवर्गीय कुटुंबातील रिक्षाचालकाच्या महाविद्यालयीन मुलीच्या शैक्षणिक फी संदर्भात प्रतीक्षा या विद्यार्थिनीने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निवेदन सादर केले. अजित पवार यांनी ते निवेदन आस्थेने वाचत तात्काळ सदर विद्यार्थिनीची संपूर्ण फी माफ करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
अजित पवार यांच्या याच कामाच्या पद्धतीमुळे बारामतीकर त्यांना नेहमीच उचलून धरतात. म्हणूनच त्यांना वेळोवेळी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लाखोच्या मताधिक्यांनी बारामतीकर निवडून देत असतात. अजित पवारांकडे कोणताही बारामतीकर कोणत्याही मध्यस्थाशिवाय सहज त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. आपल्या समस्या, कामे सांगू शकतो. अजित पवारही त्यांची आस्थेने विचारपूस करत त्यांची कामे जागच्या जागी मार्गी लावतात. याचा प्रत्यय नेहमीप्रमाणे आजही बारामतीकरांना अनुभवायला मिळाला.