पुणे : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूने बारामती येथे जोरदार प्रचार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार हे पुण्यात आले होते.
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, बारामतीमध्ये सुनेत्रा ताई यांचा पराभव निश्चित होणार असं विधान केलं. मात्र, त्यानंतर त्यांनी सारवा सारव करत त्यांचा विजय निश्चित होणार असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडल?
राज्यातील ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकणार असल्याचे महायुतीच्या नेत्याकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर त्या ४५ जागांमध्ये बारामतीची जागा असणार का असं पप्रश्न आशिष शेलार यांना पत्रकारांनी विचारला होता. त्या प्रश्नावर बोलताना शेलार म्हणाले की, बारामतीमध्ये सुनेत्रा ताई यांचा पराभव निश्चित होणार असं विधान केलं.
View this post on Instagram
मात्र, आशिष शेलार यांच्या चूक लक्षात येताच सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचे सांगत बाजू सावरून घेत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असं म्हणत बारामतीमध्ये बदल होईल, असं आशिष शेलार म्हणाले. तसेच सुप्रिया सुळे याचा पराभव नक्की होईल, किती मताने होईल हे सांगता येणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.