Ashadhi Wari 2023 उरुळी कांचन, (पुणे) : चला रे वैष्णव हो.. जाऊ पंढरीसी। होय होय वारकरी.. पाहे पाहे रे पंढरी..॥ (Ashadhi Wari 2023)
या अभंगाच्या दाखल्याची प्रचिती याच ‘देही याची डोळा ‘पाहत ऊन, सावली, याचा खेळ रंगत पंढरीच्या विठुरायाच्या ओढीने व्याकुळ झालेला भक्तीचा जनसागर टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.
पालखी थेऊर फाट्यावर पोचताच, हॉटेल एस फॉर जीतर्फे वारकऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. यावेळी हॉटेलचे मालक शिवाजी जावळे, गजाजन सानप, संदीप कुंजीर उपस्थित होते. तसेच श्रीनाथ पतसंस्थेतर्फे वारकऱ्यांना नाष्टा व मोफत औषधोपचार देण्यात आले.
यावेळी श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, सुनीता धुमाळ यांनी स्वागत केले तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे, तात्यासाहेब काळे, गणेश शिंदे, अण्णासाहेब बोडके, पालखी सोहळ्याचे सेवेकरी राजाभाऊ ढोरे पाटील यांनीही पालखीचे स्वागत केले.
पालखी कुंजीरवाडी गावात दाखल झाली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडेयांनी पालखीचे स्वागत केले. तसेच वारकऱ्यांसाठी नाष्टा, पोहे, चिवडा, पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी थेऊरचे गग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, पृथ्वीराज काकडे, रुपचंद बोडके, काळूराम कांबळे, दत्तात्रय कुंजीर, हेमंत कांबळे उपस्थित होते.
तसेच कुंजीरवाडी ग्रामपंचायतिच्या वतीने सरपंच अंजली गायकवाड, उपसरपंच अजय कुंजीर, माजी उपसरपंच चंद्रकांत मेमाणे, माजी सरपंच संतोष कुंजीर, अनुराधा कुंजीर, संग्राम कोतवाल ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी सयाजी काकडे, मोहन मेमाणे, रामदास कुंजीर, मोहन वानखडे, शैलेश जाधव यांनीही पालखीचे स्वागत केऊन वारकऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय केली होती.
पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तानाजी चौधरी, माजी सरपंच सुरज चौधरी, महादेव चौधरी, रघुनाथ चौधरी, यांनी खाऊ व पाणी वाटप केले. सोरतापवाडीत सरपंच संध्या चौधरी, उपसरपंच रवींद्र गायकवाड, अमित चौधरी, संतोष चौधरी, संजय चौधरी, आदींनी स्वागत केले.
तर कोरेगावमूळ येथे प्रभारी सरपंच वैशाली सावंत, सदस्य मंगेश कनकाटे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र जगताप, अमित सावंत यांनी स्वागत केले तसेच नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.
पालखी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील चौधरी माथ्यावर येताच उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने ‘ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन, राजाराम कांचन, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष हरीभाऊ कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य अमित बाबा कांचन आदी उपस्थित होते.