Ashadhi Vari पुणे : जगतगुरु संतशिरोमणी संत तुकाराम महाराज व श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या देहू-आळंदीत दाखल झाल्या आहेत. (Ashadhi Vari) यामुळे देहू-आळंदीत हरिनामाचा गजर सुरू आहे. (Ashadhi Vari)
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज शनिवारी (ता.२) दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अलंकापुरी अर्थात आळंदीनगरी सजली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी चार वाजता तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक
१)प्रस्थान- शनिवारी (ता.१०) दुपारी दोन वाजता
२)इमानदार वाडा शनिवारी (ता.१०) साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुक्कामासाठी
३) आकुर्डी (रविवार,ता.११)
४)नानारपेठ (सोमवार ता.१२ व मंगळवार ता.१३)
५) लोणीकाळभोर (बुधवार ता.१४)
६) यवत (गुरुवार, ता.१५)
७) वरवंड (शुक्रवार ता. १६)
८) उंडवडी गवळ्याची (शनिवार, ता.१७)
९) बारामती रविवार (ता.१८)
१०) सणसर (सोमवार ता.१९)
११) आंथुर्णे (मंगळवार ता.२०, पहिले गोल रिंगण व मुक्काम)
१२) निमगाव केतकी (बुधवार ता.२१)
१३) इंदापूर (गुरुवार, ता.२२, दुसरे गोल रिंगण व मुक्काम)
१४) सराटी (शुक्रवार, ता.२३)
१५) अकलूज (शनिवार ता.२४, गोल रिंगण)
१६)माळीनगर (रविवार, ता.२५, सकाळी पहिले उभे रिंगण)
१७)बोरगाव (रविवार, ता.२५, रात्री मुक्काम)
१८)पिराची कुरोली (सोमवार, ता.२६)
१९)वाखरी (मंगळवार, ता.२७, बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.
२०)पंढरपूर (बुधवार, ता.२८, दुपारी उभे रिंगण होईल)
२१)पंढरपूर (बुधवार, ता.२९ जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान(मंदिर) येथे मुक्कामी असेल.
दरम्यान, पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या (मंदिर) नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे गुरूवार दि. १९ जून ते सोमवार दि. ३ जुलै २०२३ रोजी दुपारपर्यंत असणार आहे. ३ जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरूवात करेल. पालखी परत येताना १० दिवसांचा प्रवास करून १३ जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहू येथे थांबेल.