केडगाव (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. खडकवासला धरणातून मुळा मुठा नदी पात्रात बुधवारी (दि. 24) रात्री 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, दौंड तालुक्यातील नदी काठावरील नागरिकांना आपतकालीन पथकाने याची योग्य माहिती न दिल्यामुळे नदी पात्रातील विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यातील इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर धरणेही भरली आहेत. तसेच इतर धरणातील पाणी खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने मुळा मुठा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.
मंगळवारी मुळा मुठा नदीच्या तळाशी असणारे पाणी बुधवारी रात्री पाणी अचानक दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे नदीत सोडलेल्या पाण्यामुळे विद्युत पंप काढून घेण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. त्यात अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप अचानक रात्रीत पाणी वाढल्याने पाण्यातच राहिल्याचे पाहायला मिळाले …