पुणे : एमआयटी कला, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग आणि एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांनी भारतातील ५० हून अधिक कंपन्यांसोबत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट व इटर्नशीपसाठी सामंजस्य करार केले.
या सामंजस्य करारावर एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनीता कराड आणि एमआयटी-एसओईचे संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र शेठे यांनी स्वाक्षरी केली. यावेळी फिलिप्स मशीन टूल्स इंडिया प्रा. लि., नवी मुंबई, शीतल वायरलेस टेक्नॉलॉजीज प्रा. लिसह अन्य कंपन्यांचे मान्यवर उपस्थित होते.
सामंजस्य कराराद्वारे एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि सर्व कंपन्यांच्या परस्पर सहकार्यातून संशोधन, प्राध्यापक, विद्यार्थांच्या इंडस्ट्रीयल भेटी आणि सक्षम युवा पिढी घडविण्यासाठीचे कार्य होईल. संबंधित कंपन्यांच्या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी, संयुक्त कार्यशाळा, परिषदा, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतील.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की या सामंजस्य करारामुळे संशोधनावर आधारित अध्यापन होणार आहे. सर्वोत्कृष्ट संशोधन सुविधा, शिक्षण आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल. हा सामंजस्य करार प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे.
फिलिप्स मशीन टूल्स इंडियाचे जनरल मॅनेजर सीट कालकर म्हणाले, दोन्ही संस्थांमध्ये एकमेकांस पूरक आहेत. ज्याचा उपयोग हा सामंजस्य करार यशस्वी करण्यासाठी केला पाहिजे. या सामंजस्य कराराद्वारे दोन्ही संस्थांचे अध्यापन आणि संशोधन दोन्ही उपक्रम परस्पर समृद्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे.
फिलिप्स मशीन टूल्स इंडिया, नवी मुंबई, शीतल वायरलेस टेक्नोलॉजीज, नेक्सझू मोबिलीटी, अदित्य कंट्रोल सिस्टिम, पुणे, रेविन टेक, पुणे, इन्टुप्ले टेक्नॉलॉजी, तिरुपति एंटरप्राइजेज, तिरुपति इलेक्ट्रॉनिक्स, आर एस ऑटोमेशन, इनोवेशन हब सर्विसेज, एडमिटर ओवरसीज, अप्लाय वोल्ट, एंटोलिन सोलर एंड इलेक्ट्रिकल्स, यवतमाळ, एंटोलिन टेक्नोलॉजी सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड, साधना आईटी सॉल्यूशंस, पुणे, इव्ही रेवोल्यूशन, प्रोविज सिस्टम्स यासह अन्य कंपन्यांचा यात समावेश होता.