दौंड: दौंड तालुक्यातील केडगाव व बोरीपार्धी परिसर झपाट्याने विकसित होत असून नागरिकांची वाढती वस्ती लक्षात घेता, भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. ही गरज ओळखून, केडगाव-बोरीपार्धी परिसरासाठी मोठ्या साठवण क्षमतेचा तलाव किंवा बंधारा बांधण्याची मागणी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंददादा थोरात व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
केडगाव स्टेशनच्या दक्षिणेस व श्री बोरलनाथ मंदिराच्या पश्चिमेस वनविभागाची सुमारे 40-50 एकर जमीन या प्रकल्पासाठी त्यांनी सुचवली असून, त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करून जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती हांडे मॅडम व इतर अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना आवश्यक सूचना करण्यात आलेल्या आहेत.
संबंधित विभागाकडून लवकरच सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असून, या साठवण तलावाच्या प्रकल्पामुळे केडगाव व बोरीपार्धी परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटणार आहे हा तलाव म्हणजे फक्त एक प्रकल्प नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्थिर व शाश्वत पाणीपुरवठ्याचा एक दृष्टीकोन आहे असे ग्रामस्थांना आश्वासन दिले.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंददादा थोरात, संचालक आप्पासाहेब हंडाळ, माजी संचालक धनाजी शेळके, किरण देशमुख, बोरीपार्धीचे सरपंच बाळासाहेब सोडनवर, माजी सरपंच जयदीप सोडनवर, टाऊनप्लॅनिंगचे अधिकारी दत्तात्रय काळे साहेब, साप्ताहिक माझा मतदारचे संपादक गौरव गुंदेचा यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.