राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वडगावपीर गावात वनराई बंधारा बांधण्यात आला. शेतीतील कामे चालू असताना देखील गावातील जेष्ठ मंडळी, तरुण सहकारी, प्रगती विद्यालयातील विद्यार्थी, महिला बचत गटाच्या महिला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पाणी पातळी वाढण्यास मदत होणार
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची ही महत्वाकांक्षी योजना असून, वनराई बंधारा बांधून पूर्ण झाल्याने याचा फायदा पाणी अडवण्यासाठी होणार आहे. (Ambegaon News) असे अनेक बंधारे बांधले तर त्याचा जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होऊन गावाला फायदा होणार आहे.
प्रत्येक गावात असे वनराई बंधारे बांधण्याची गरज असून, त्यातून जमिनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. डोंगराळ भागात अधिकच्या प्रमाणात हे बंधारे बांधण्याची गरज असून, त्यासाठी प्रत्येक गावाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (Ambegaon News) ग्रामस्थांनी अशा कामात एक तास श्रमदान केले तरी त्याचा मोठा फायदा गावाला होईल, असे मत सरपंच मिराताई पोखरकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमप्रसंगी वडगावपीर सरपंच मिराताई पोखरकर, माजी सरपंच संजय पोखरकर, चेअरमन पोपट राजगडे, उद्योजक फकिराशेठ आदक, उपसरपंच अनिता शिंदे, पुष्पा लंके, डॉ. राक्षे, माजी उपसरपंच अण्णासाहेब पोखरकर, माजी उपसरपंच रवींद्र गुळवे, माजी उपसरपंच संगिता साबळे, ग्रामपंचायत सदस्य निलम आदक व गावातील महिला व पुरूष ग्रामस्थ, प्रगती विद्यालयाचे विद्यार्थी, वनविभागाचे अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व रेस्क्यू मेंबर उपस्थित होते.
मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमुख स्मिता राजहंस यांनी देखील यात सहभाग नोंदवला. (Ambegaon News) या वेळी धामणी विभागाच्या वनपाल सोनल भालेराव, पूजा पवार, दिलीप वाघ यांनी देखील या उपक्रमात सहभागी होऊन श्रमदान केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : ‘भीमाशंकर’मार्फत सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप
Ambegaon News : पोंदेवाडीत नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तन, संगीत खूर्ची अन् दांडियांची धूम…
Ambegaon News : आदर्श भूमिपुत्र पुरस्कार पत्रकार मधुकर गायकवाड यांना जाहीर