राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री शिवाजी विद्यालय व ज्यूनिअर कॉलेजने जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले. शाळेतील १२ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : चैतन्य जालिंदर जाधव (अकरावी, वैयक्तिक १०० मी. धावणे, प्रथम क्रमांक), रुपेश अनिल बढेकर (बारावी, वैयक्तिक- लांब उडी, प्रथम क्रमांक, गोळाफेक- तृतीय क्रमांक, थाळीफेक- तृतीय क्रमांक), प्रथमेश बाळासाहेब जाधव (बारावी, वैयक्तिक- उंच उडी- प्रथम क्रमांक), धनश्री हरिश्चंद्र गवंडी (बारावी, वैयक्तिक भालाफेक- प्रथम क्रमांक व १५०० मी धावणे- द्वितीय क्रमांक). सुवर्णा सुरेश आदक (बारावी, १५०० मी. धावणे- प्रथम क्रमांक व ५ कि.मी. चालणे द्वितीय क्रमांक), (Ambegaon News) माधुरी केदारी (बारावी, ३००० मी. धावणे- प्रथम क्रमांक), आशा केदारी (बारावी, ३००० मी. धावणे- द्वितीय क्रमांक), वैष्णवी भागवत (नववी, ३ कि.मी. चालणे- द्वितीय क्रमांक) यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
१७ वर्षे मुली, रिले- प्रथम क्रमांक- सायली सुर्वे, स्मिता जाधव, मुस्कान इनामदार, ज्ञानेश्वरी मिंडे, संस्कृती जाधव यांची जिल्हास्तरावर निवड झाली.(Ambegaon News) १४ वर्षे मुले, रिले- तृतीय क्रमांक- शाहिद इनामदार, अथर्व रोडे, ओम भागवत, साहिल जाधव, स्वराज जाधव. सिमरन इनामदार (बारावी, २०० मी. धावणे- तृतीय क्रमांक. साक्षी बढेकर (बारावी, ५ कि.मी. चालणे- तृतीय क्रमांक).
१४ वर्षे मुली- रिले- चौथा क्रमांक- अल्नाज इनामदार, श्रेया करंजखेले, ऋतुजा भगत, धनश्री जाधव, ऋग्वेदा वाघ. आर्यन सुक्रे ८०० मी. धावणे चौथा क्रमांक. सनिकेत धुमाळ १५०० मी. धावणे चौथा क्रमांक.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक ए. एल. निघोट, एच. एस. भालिंगे, पी. ए. वाईन्देशकर यांचे स्थानिक शाळा समिती व ग्रामस्थांनी अभिनंदन केले, (Ambegaon News) अशी माहिती प्राचार्य डी. आर. गायकवाड यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : शिवसेनेचे (उबाठा) पुणे जिल्हा संघटक अविनाश रहाणे अनंतात विलीन
Ambegaon News : शिरदाळे येथे बटाटा उत्पन्नात निम्म्याने घट; नुकसानभरपाई देण्याची मागणी
Ambegaon News : वडगावपीर-मांदळेवाडी गावांसाठी दोन एसटी बस सुरु