Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे ‘शिवशाही’ एस. टी. बस चालकाला मारहाण प्रकरणी तिघांना बेड्या ; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 13 October 2023, 17:58

Loni Kalbhor  : लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर शिवशाहीच्या एस.टी. बस चालकाला कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या चारपैकी तीन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरातून अटक केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी

उपेंद्र दुधनाथ पासवान (वय २५, रा. सध्या भिम नगर शिंदे वस्ती, हडपसर, मुळ रा. मजाक कंपनीजवळ, शिक्रापूर), भागवत रमेश अंबुरे, (वय २२, रा. सध्या भिमनगर, शिंदे वस्ती हडपसर, मूळ रा. खानापूर, ता. पातूर, जि. अकोला) आबासाहेब कैलास पऱ्हाड (वय ३३, रा. अष्टविनायक कॉलनी, पापडे वस्ती, फरसुंगी, मुळ रा. मु. पो केंदूर, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. (Loni Kalbhor ) त्यांच्याकडून एक मोबाईल फोन, एक दुचाकी असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी दिली.

याप्रकरणी सुखसागर गोरखनाथ कदम (वय ३५, रा. तुळजापूर, सिडको, जि. धाराशिव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागर कदम हे सोलापूर बस स्थानकात चालक म्हणून काम करतात. (Loni Kalbhor ) गुरुवारी (ता. १२) दुपारी पुण्यावरून त्यांच्याकडे असलेली शिवशाही एस.टी. बस घेऊन ते सोलापूरच्या दिशेने निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती येथील युनियन बँकेशेजारी आले असता, पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडील मोटारसायकलवरुन सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी एका दुचाकीवरील दोघेजण घसरुन शिवशाही एसटी बससमोर पडले.

गाडीवरून खाली पडल्याच्या रागातून चौघांनी सुखसागर कदम यांना एस.टी. बसमध्ये घुसून शिवीगाळ करुन आम्हाला कट मारतो काय? तुझी गाडी फोडुन टाकीन? असे म्हणुन फिर्यादी यांना गाडी चालविण्यात अडथळा करून हाताने तोंडावर मारहाण करुन त्यांच्याकडील रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी करुन पळून गेले होते. (Loni Kalbhor ) यावेळी घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, केतन धेंडे, अक्षय कटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी रत्यावर झालेली वाहतूक कोंडी हटवली. त्यानुसार बसचालक कदम यांनी अज्ञात चौघांविरोधात फिर्याद दिली होती.

या घटनेचा शोध लोणी काळभोर ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी घेत असताना धायगुडे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवडीपाट परिसरात थांबले आहेत.(Loni Kalbhor ) ही माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकासह टोलनाका परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान, त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने विचारपूस केली असता, संबंधित गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल फोन, एक दुचाकी असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गायकवाड, सायकर, देविकर, नागलोत, जाधव, कुदळे, शिरगीरे, पाटील यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor : वंध्यत्वाने त्रस्त दाम्पत्यांसाठी उर्मी फर्टीलिटी सेंटर ही नवीन आशा ठरेल; राहुल कराड यांचा विश्वास

Loni Kalbhor : विश्वराज हॉस्पिटलमध्ये लवकरच रोबोटिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया होतील; डॉ. अदिती कराड यांचे आश्वासन

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे सहा जणांच्या टोळक्याने रिल्स बनवण्यासाठी केला शिवशाहीचा पाठलाग, शेवटी अपघात झाल्यावर ड्रायव्हरलाच चोपले ; दुपारी दीडची घटना..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Ambegaon News : श्री शिवाजी विद्यालयाचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.