राजू देवडे
Ambegaon News : लोणी धामणी : दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत १७, १८ व १९ ऑक्टोबर रोजी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप गावोगावी करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेची उपस्थितीही स्मार्ट कार्डद्वारे घेतली जाणार
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद व ऊस उत्पादकांसाठी नेहमीच भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. या स्मार्ट कार्डमुळे सभासद व ऊस उत्पादकांना साखर वाटप करणे सुलभ होणार आहे. तसेच स्मार्ट कार्डमुळे सभासद व ऊस उत्पादकांना घरबसल्या शेअर्सबाबत व आपल्या ऊसाच्या नोंदणीची, गाळपास आलेल्या प्रत्येक ऊस वाहनाच्या वजनाची, पंधरवडा ऊस बिलाची (ऊस विकास सवलती कपात तपशीलासह) संपूर्ण माहिती मिळणार आहे. (Ambegaon News) तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची उपस्थितीही स्मार्ट कार्डद्वारे घेतली जाणार आहे. भविष्यात स्मार्ट कार्डद्वारेच ऊसाची नोंदणी घेवून ऊस तोड केली जाणार आहे.
उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, सभासद व ऊस उत्पादकांनी आपला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना) देवून स्मार्ट कार्ड घ्यावे. तसेच मुंबई, पुणे व बाहेरगावी रहिवाशी असलेल्या सभासद व ऊस उत्पादकांनी आपल्या स्थानिक कुटुंबातील सदस्यास किंवा इतर नातेवाईकास मोबाईलद्वारे आधार कार्ड, ओळखपत्र व संमतीपत्र पाठवून स्मार्ट कार्ड घेता येईल. (Ambegaon News) सभासद व ऊस उत्पादक मृत झाल्यास कागदपत्रांची कारखान्यावर पूर्तता करून स्मार्ट घेता येईल.
कार्ड हरविल्यास कार्डचा दुरुपयोग होवू नये याकरिता त्वरित कारखान्याशी संपर्क साधावा. त्यामुळे कार्डवरील सुविधा बंद करणे शक्य होईल व नवीन कार्ड १०० रूपये भरणा करून कारखाना साईटवर उपलब्ध करून देता येईल. (Ambegaon News) आधार कार्डप्रमाणेच महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून स्मार्ट कार्डचे जतन करून कारखाना सुविधांचा लाभ घ्यावा व स्मार्ट कार्डचा गैरवापर होणार नाही याची दक्षता सभासद व ऊस उत्पादकांनी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : पोंदेवाडीत नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तन, संगीत खूर्ची अन् दांडियांची धूम…
Ambegaon News : आदर्श भूमिपुत्र पुरस्कार पत्रकार मधुकर गायकवाड यांना जाहीर
Ambegaon News : धामणीत तीन दिवसांपासून जिओ ‘आऊट ऑफ रेंज’