कैलास गायकवाड
Ambegaon News : लोणी : कपाळी कुंकू, विधवत पूजन आणि आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून घेतलेला आशीर्वाद, या भावनिक वातावणात मंगलमयता निर्माण झाली होती. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूप्रमाणे आई-वडिलांचे पूजन करण्याला महत्व आहे. हे मुलांना पटवून देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील श्री गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मातृपितृ पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातृपितृ पूजन
यानिमित्त प्राध्यापक अशोक महाराज शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या शाळेमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. (Ambegaon News) यावेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप धुमाळ, माजी सरपंच उद्धव लंके ,माजी उपसरपंच गणेश गायकवाड, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक चंद्रकांत गायकवाड, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कैलास गायकवाड, माजी सरपंच दिलीप वाळुंज, उद्योजक सुधीर सोनार,पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी भवारीर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळशिराम वाळुंज, उपाध्यक्ष गीतांजली लंके, चंद्रकला वाळुंज, माया जंगम, राहुल भागवत, राजेश ढोबळे, शंकर कदम, राजश्री मोटे, अमित क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले. (Ambegaon News) पोलीस अधिकारी किसन गायकवाड, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील, माजी पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज, गुलाबराव गायकवाड, सुधीर सोनार, विशाल उदागे सुमित वाळुंज, ठकाराम वाळुंज यांचे सहकार्य लाभले.
सातव्या दिवशी श्री गणेशाची विसर्जन करण्यात आले. यानिमित्ताने श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम व ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला…’ या गाण्यावर नृत्य केले. यावेळी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राध्यापक अशोक महाराज शिंदे म्हणाले की, समाजात संस्कृती जोपासण्याचे काम मागे पडत आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अवलोकन करण्याचे काम ही पिढी करत असून, भारतीय संस्कृतीला जडा जाण्याचे काम होत आहे. त्यामुळे आई-वडिलांनी यापुढे भारतीय संस्कृती जपण्याचे काम करणे गरजेचे आहे. (Ambegaon News) त्यातून मुलांमुलींवर उत्तम संस्कार करणे गरजेचे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ambegaon News : भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी
Aambegaon News : मान्सूनच्या परतीच्या पावसाने आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा