Ambegaon | आंबेगाव, (पुणे) : मासेमारीसाठी पाण्यात विजेचा करंट सोडणं मच्छिमाराच्या अंगलट आले आहे. मासेमारी करताना तरुणाचाच विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश भिमाजी मधे (वय – ५०, रा. टाव्हरेवाडी, ता. आंबेगाव) असे मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी सविता मधे यांनी फिर्याद दिली आहे.
डी पी वरून वायर जोडून विजेचा करंट पाण्यात…
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मधे व पत्नी सविता मधे ४० वर्षांपासून टाव्हारेवाडी येथे उत्तम टाव्हरे यांच्याकडे शेत मजूर म्हणून काम करतात. जवळ असणाऱ्या बंधाऱ्यावर मासेमारी साठी जात होते. मासेमारी करण्याअगोदर ते नेहमी बंधाऱ्याच्या जवळ असणाऱ्या लाईटच्या डी पी वरून वायर जोडून त्या वायर मधून येणारा विजेचा करंट पाण्यात सोडत. मासे बेशुद्ध करून ते मासेमारी करत होते.
रविवारी (ता. १४) मासेमारी करत असताना प्रकाश मधे हे बंधाऱ्याच्या पाण्यात पडल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या जवळ काळ्या रंगाची वायर व ती वायर लाईटच्या डीपीला जोडलेली दिसली. त्यानंतर उत्तम तुकाराम टाव्हरे व ग्रामस्थांनी ती वायर डीपीतुन काढुन प्रकाश मधे यांना पाण्याच्या बाहेर काढले.
विजेचा शॉक बसूनच मृत्यू…
दरम्यान, मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावरून मंचर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र पाण्यात विजेची वायर सापडल्याने विजेचा शॉक बसूनच मृत्यू झाला असल्याचे अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ambegaon News | बिबट्याची दहशत… 3 शेळ्यांचा पाडला फडशा
Ambegaon News : बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र थांबेना ! दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर केला हल्ला