उरुळी कांचन : बदलापूर (मुंबई) येथील शाळेतील दोन लहान मुलींवर बलात्कार, पश्चिम बंगालमधील हिंदुंवर अत्याचार, महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्या या घटनांचा उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामस्थांच्या वतीने सर्व पक्षीय निषेध व्यक्त करण्यात आला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिर येथे हा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, दत्तात्रय कांचन, शहराध्यक्ष रामदास तुपे, युवक उपाध्यक्ष सागर कांचन, महादेव बापू कांचन, सागर नाना कांचन, संतोष गायकवाड, तुकाराम कांचन, काळूराम मेमाणे, प्रताप कांचन, शरद वनारसे, बाळासाहेब कांचन, रमेश तुपे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या गुन्ह्यात जो कोणी गुन्हेगार आहे, आणि त्याला मदत करणारे जे कोणी असतील या सर्वांना तुरुंगात टाकून त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याबाबत योग्य ती पावले उचलून याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आला.