उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व परिसरात वाजवी दरात सर्वोत्तम सेवा पुरविण्याच्या उद्देशाने डॉ. राजेश आखाडे, डॉ. परिमल परदेशी आणि डॉ. नितीन शिरोळे यांनी आपल्या अद्यावत वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून प्राईमप्लस या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची स्थापना केली. उरुळी कांचन – शिंदवणे रत्यावर उरुळी कांचन हद्दीत एकाच छताखाली रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
नव्या सुसज्ज रुपात प्राईमप्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साकारत असून रुग्णांना अधिक दर्जेदार रुग्णसेवा यानिमित्ताने मिळणार आहेत. पंधरा वर्ष रुग्ण सेवेचा अनुभव पाठीशी असणारे आपले डॉक्टर्स, नवीन हॉस्पिटल, नवीन कौशल्यपूर्ण हात, उपचारापलीकडची सुश्रुषा, किफायतशीर दरात अत्याधुनिक सुविधांसहित आपल्या सेवेशी सदैव तत्पर प्राईम प्लस हॉस्पिटल आहे.
कोविडच्या काळात अनेक रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यापासून ते रेमडीसेव्हर इंजेक्शन्स मिळवून देण्यात तिन्ही डॉक्टरांची यांनी मोलाची भूमिका बजावली. याकाळात अनेक रुग्णांना बेड अभावी व ऑक्सिजन कमतरता असल्याकारणाने आपला जीव गमवावा लागला. हे ओळखून उरुळी कांचन आणि परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सेवा वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून या तिन्ही डॉक्टरांनी एका अत्याधुनिक सुविधांनी युक्त आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न पाहिले आणि पाहता पाहता ते प्रत्यक्षात उभे केले.
सगळ्यांनाच सातत्याने वाटणारी भीती दूर सारून त्यांनी इतर सहकारी डॉक्टरांच्या मदतीने अनेकदा सामाजिक उपक्रमातही सक्रीय सहभाग घेतला. आजही अनेक रुग्णांच्या मदतीसाठी ते तत्पर असतात. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न बाळगता अनेकदा सामाजिक बांधिलकी मानून ते काम करत राहतात.
प्राईमप्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची वैशिष्ट्ये –
– 24 सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयु)
– सुसज्ज अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर
– अत्याधुनिक लॅबोरेटरी
-प्रशस्त बाह्य व अंतरुग्ण विभाग
-प्रसूती व लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग
– सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम
• आधुनिक सी – आर्म व सर्व शस्त्रक्रिया
– न्युरो & ट्रामा युनिट
– डिजिटल एक्सरे मशीन
– अत्याधुनिक लॅबोरेटरी
– 24 तास मेडिकल स्टोअर
– 24 तास रुग्णवाहिका