युनूस तांबोळी,
शिरूर : पाळीव प्राणी बिबट्याच्या भक्षस्थानी या घटना नवीन नाहित. पण बिबट्यांचा झालेला सुळसुळाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे. अंगणात, रस्त्यावर, शेतात दबा धरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करत आहे. अशा घटनांनी “नुकसानभरपाई की सुरक्षीततेची हमी” असाही बिबट्याचा वावर हा तारांकित प्रश्न निर्माण होणे गरजेचा आहे. त्यातून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचामुख्य प्रश्न सुटला पाहिजे.
मात्र, वनविभाग पंचनाम्यावरून ‘नुकसान भरपाई’ या नावाखाली प्राण्यांसारखा मानवाच्या जीवाचा सौदा करूलागला आहे. शेतासाठी विज दिवसा किंवा रात्री यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सुटणार आहे काय? शेतालगत प्रवास करतानारस्त्यावरच पत्नीला बिबट्याने ओढून नेऊन ठार केले. ही घटना ताजी असताना बिबट्याचा बंदोबस्त करणार कसा?असा जाणकार सवाल उपस्थीत करू लागले आहेत.
शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यात बागायती शेती पाठोपाठ शेतीपुरक व्यवसाय केला जातो. धरण, नद्या, कालवे यामुळे
या भागात पाण्याचे व्यवस्थापन झाले आहे. वाढत्या उसाच्या क्षेत्रामुळे बिबट्याला वास्तव करण्यास आडोसा मिळतो. १३ ते १४ महिने उसाचीतोडणी होत नसल्याने बिबटच्या प्रजननाला चांगली संधी मिळते. त्यामुळेच शिरूर, आंबेगाव व जुन्नर या परिसरात बिबट्यांची संख्येतमोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरात पशुपालकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.
पावसाळा संपला की घाट माथ्य़ाकडे जाणारा मेंढपाळ याच्याकडे असणाऱ्या मेंढ्याची शिकार बिबट्या नेहमीच करताना दिसतो.
ऊस तोडणी करण्यास सुरवात झाली की या बिबट्यांचा आडोसा नाहिसा होतो.त्यामुळे हे बिबट मानव वस्तीत असणाऱ्या पाळीव
प्राण्यांची शिकार करताना दिसतात. पाळीव प्राण्यांची शिकार झाली की संबधीत शेतकऱ्याची स्थळपहाणी करून पंचनामा केला जातो.
त्यानंतर शिकार झालेल्या प्राण्याचे छायाचित्रण करून तालुका पशुवैद्यकिय अधिकाऱ्याचा अहवाल घेऊन पुढील ‘नुकसान भरपाई’
मिळण्यासाठी वरिष्ट कार्यालयात पाठवली जाते.यामध्ये कालावधी लोटल्यानंतर सुव्यस्थित केलेल्या पंचनाम्याने नुकसान भरपाई बॅकेच्या खात्यात जमा होते.
मेंढी, घोडा, शेळी,गाय, म्हैस व इतर प्राण्यांसाठी वनविभागाने एक विशिष्ट रक्कम ठरवून दिली आहे. ती रक्कम मिळते. यामध्ये अधिक नुकसान झाले असलेतरी देखील वनविभागाने ठरवून दिलेली रक्कम मिळते. त्यातून शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होते. या बाबत वनविभागाला कोणीही विचारणाकरत नाही. फक्त वनविभागाने तुमची नुकसान भरपाई दिली ना ? या जोरावर वेळ मारून नेण्याचे काम वनविभागाकडून केले जाते.
बिबट्याने संपुर्ण सावज ऊसाच्या क्षेत्रात ओढून नेऊन ठार केले. वनविभागाला कोणतेही अवशेष सापडले नाही तर नुकसान भरपाई मिळतनाही. त्यासाठी ठार केलेल्या पाळीव प्राण्याचे अवशेष शोधण्याची पराकाष्टा त्या शेतकरी किंवा मेंढपाळाला करावी लागते.
गेल्या तीन वर्षात शिरूर तालुक्यात जांबूत येथे सगळ्यात जास्त मानवी वस्तीवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अंगणात खेळणाऱ्याचिमूरडीवर, शेतात पहाणी करणाऱ्या शेतकऱ्य़ावर, लघुशंकेसाठी गेलेल्या तरूण मुलीवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली.
नुकतीच पिपंरखेड ( ता. शिरूर )येथून प्रवास करत असणाऱ्या पती व दिरा समोर पत्नीला बिबट्याने ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडली.यामध्ये वनविभागाने पंचनामा करून या कुटूंबाला विस लाख रूपये देण्याची घोषणा केली. त्या कुटूंबाला ती रक्कम मिळेल देखील मात्र मानवाचा जन्म त्याला परत प्राप्त होणार आहे काय? असा सवाल जाणकार करू लागले आहेत.
याबाबत बोलताना शिरूर आंबेगाव विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर म्हणाले की, दिवसेंदिवस बिबट प्रवण क्षेत्राची वाढ होऊ लागली आहे. यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मानवावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी वनविभागाने रात्रीच्या गस्ती वाढविल्या पाहिजे. “नुकसान भरपाई की सुरक्षीततेची हमी” ‘बिबट्याचा वावर’ या बाबत तारांकितप्रश्न करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहे. नकसान भरपाई पाठोपाठ सुरक्षीततेसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांनी बिबट्या पासून बचावाबाबत वनविभागाचे मार्गदर्शन घ्यावे. लवकरच या बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पाचुंदकर यांनी दिली.
दिवसा विजेची मागणी…!
शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. मागील काळात पाळीव प्राण्यांवर हल्ला होऊन जवळपास
दोन कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून वनविनागाने दिली. शिरूर तालुक्यात मानवावर हल्ला होण्याची घटना अधिक झाल्या आहेत.
त्यामुळे रात्रीत होणाऱ्या बिबट हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी महावितरणने दिवसा विज पुरवठा करावी अशी मागणी आंबेगाव तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केले आहे.
सवाल जाणकारांचा ?
घटना घडल्यानंतर चार दिवसात वनविभागाने एका बिबट्यांचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद केले. या भागात बिबट्यांची संख्या मोठी
असताना हा बिबट नरभक्षक कशावरून? शेतकामासाठी दिवसा विज मिळावी यासाठी आग्रह धरला जातो.हे योग्यही असू शकेल पण
शेतीत दिवसा काम करत असताना बिबट्यापासून संरक्षण कोण करणार ? शाळेतील विद्यार्थी, प्रवासी यांचा विचार होऊन
नुकसान भरपाई बरोबरच सुरक्षीततेची हमी या बाबत विचार होणे गरजेचे आहे.