Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News: Maharashtra Budget : अर्थसंकल्प ९ मार्चला तर अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रवारी ते २५ मार्च दरम्यान..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 February 2023, 19:15

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१३ दरम्यान होणार होणार असून या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत संदर्भातील निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.

या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

बैठकीत २७ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल.

अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधेयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

 मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता..

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राज्याचा कारभार मोजकेच मंत्री हाकत आहेत. तसेच शिंदे गटातील अनेक आमदार देखील नाराज असल्याचे बोलले जात असल्याने हा मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनेक महामंडळाचे वाटप देखील करण्यात आलेले नाही, त्यामुळे यासाठी देखील चांगले महामंडळ मिळविण्यासाठी अनेक आमदार प्रयत्नशील आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पूर्णेकर प्रकरणाचे ठाण्यात पडसाद! मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Thursday, 29 October 2026, 16:18

सिंहगड लॉ कॉलेजमध्ये ‘DPCA 2.0’ राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न; पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

Thursday, 29 October 2026, 15:56

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित,मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Thursday, 29 October 2026, 15:56

सासवड-भिवरी रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ,अपघातानंतर टेम्पो सोडून चालक पसार

Thursday, 29 October 2026, 15:49

कुंजीरवाडीतील पेट्रोल पंपावर झोपलेल्या ट्रकचालकांचे दोन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला

Thursday, 29 October 2026, 15:41

लोणी स्टेशन चौकात धोकादायक पद्धतीने वाहन उभे; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 15:28
Next Post

बातमी मागची बातमी! आला रे आला...बिबट्या आला ; शेतकऱ्यांनो कुटूंब संभाळा, "नुकसान भरपाई की सुरक्षीततेची हमी", बिबट्याचा वावर तारांकित प्रश्न - शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp