Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बातमी मागची बातमी! आला रे आला…बिबट्या आला ; शेतकऱ्यांनो कुटूंब संभाळा, “नुकसान भरपाई की सुरक्षीततेची हमी”, बिबट्याचा वावर तारांकित प्रश्न – शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 February 2023, 9:44

युनूस तांबोळी,

शिरूर : पाळीव प्राणी बिबट्याच्या भक्षस्थानी या घटना नवीन नाहित. पण बिबट्यांचा झालेला सुळसुळाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे. अंगणात, रस्त्यावर, शेतात दबा धरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करत आहे. अशा घटनांनी “नुकसानभरपाई की सुरक्षीततेची हमी” असाही बिबट्याचा वावर हा तारांकित प्रश्न निर्माण होणे गरजेचा आहे. त्यातून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचामुख्य प्रश्न सुटला पाहिजे.

मात्र, वनविभाग पंचनाम्यावरून ‘नुकसान भरपाई’ या नावाखाली प्राण्यांसारखा मानवाच्या जीवाचा सौदा करूलागला आहे. शेतासाठी विज दिवसा किंवा रात्री यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सुटणार आहे काय? शेतालगत प्रवास करतानारस्त्यावरच पत्नीला बिबट्याने ओढून नेऊन ठार केले. ही घटना ताजी असताना बिबट्याचा बंदोबस्त करणार कसा?असा जाणकार सवाल उपस्थीत करू लागले आहेत.

 

शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यात बागायती शेती पाठोपाठ शेतीपुरक व्यवसाय केला जातो. धरण, नद्या, कालवे यामुळे
या भागात पाण्याचे व्यवस्थापन झाले आहे. वाढत्या उसाच्या क्षेत्रामुळे बिबट्याला वास्तव करण्यास आडोसा मिळतो. १३ ते १४ महिने उसाचीतोडणी होत नसल्याने बिबटच्या प्रजननाला चांगली संधी मिळते. त्यामुळेच शिरूर, आंबेगाव व जुन्नर या परिसरात बिबट्यांची संख्येतमोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरात पशुपालकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.

पावसाळा संपला की घाट माथ्य़ाकडे जाणारा मेंढपाळ याच्याकडे असणाऱ्या मेंढ्याची शिकार बिबट्या नेहमीच करताना दिसतो.
ऊस तोडणी करण्यास सुरवात झाली की या बिबट्यांचा आडोसा नाहिसा होतो.त्यामुळे हे बिबट मानव वस्तीत असणाऱ्या पाळीव
प्राण्यांची शिकार करताना दिसतात. पाळीव प्राण्यांची शिकार झाली की संबधीत शेतकऱ्याची स्थळपहाणी करून पंचनामा केला जातो.

त्यानंतर शिकार झालेल्या प्राण्याचे छायाचित्रण करून तालुका पशुवैद्यकिय अधिकाऱ्याचा अहवाल घेऊन पुढील ‘नुकसान भरपाई’
मिळण्यासाठी वरिष्ट कार्यालयात पाठवली जाते.यामध्ये कालावधी लोटल्यानंतर सुव्यस्थित केलेल्या पंचनाम्याने नुकसान भरपाई बॅकेच्या खात्यात जमा होते.

मेंढी, घोडा, शेळी,गाय, म्हैस व इतर प्राण्यांसाठी वनविभागाने एक विशिष्ट रक्कम ठरवून दिली आहे. ती रक्कम मिळते. यामध्ये अधिक नुकसान झाले असलेतरी देखील वनविभागाने ठरवून दिलेली रक्कम मिळते. त्यातून शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होते. या बाबत वनविभागाला कोणीही विचारणाकरत नाही. फक्त वनविभागाने तुमची नुकसान भरपाई दिली ना ? या जोरावर वेळ मारून नेण्याचे काम वनविभागाकडून केले जाते.

बिबट्याने संपुर्ण सावज ऊसाच्या क्षेत्रात ओढून नेऊन ठार केले. वनविभागाला कोणतेही अवशेष सापडले नाही तर नुकसान भरपाई मिळतनाही. त्यासाठी ठार केलेल्या पाळीव प्राण्याचे अवशेष शोधण्याची पराकाष्टा त्या शेतकरी किंवा मेंढपाळाला करावी लागते.
गेल्या तीन वर्षात शिरूर तालुक्यात जांबूत येथे सगळ्यात जास्त मानवी वस्तीवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अंगणात खेळणाऱ्याचिमूरडीवर, शेतात पहाणी करणाऱ्या शेतकऱ्य़ावर, लघुशंकेसाठी गेलेल्या तरूण मुलीवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली.

नुकतीच पिपंरखेड ( ता. शिरूर )येथून प्रवास करत असणाऱ्या पती व दिरा समोर पत्नीला बिबट्याने ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडली.यामध्ये वनविभागाने पंचनामा करून या कुटूंबाला विस लाख रूपये देण्याची घोषणा केली. त्या कुटूंबाला ती रक्कम मिळेल देखील मात्र मानवाचा जन्म त्याला परत प्राप्त होणार आहे काय? असा सवाल जाणकार करू लागले आहेत.

याबाबत बोलताना शिरूर आंबेगाव विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर म्हणाले की,  दिवसेंदिवस बिबट प्रवण क्षेत्राची वाढ होऊ लागली आहे. यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मानवावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी वनविभागाने रात्रीच्या गस्ती वाढविल्या पाहिजे. “नुकसान भरपाई की सुरक्षीततेची हमी” ‘बिबट्याचा वावर’ या बाबत तारांकितप्रश्न करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहे. नकसान भरपाई पाठोपाठ सुरक्षीततेसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांनी बिबट्या पासून बचावाबाबत वनविभागाचे मार्गदर्शन घ्यावे. लवकरच या बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पाचुंदकर यांनी दिली.

दिवसा विजेची मागणी…!
शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. मागील काळात पाळीव प्राण्यांवर हल्ला होऊन जवळपास
दोन कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून वनविनागाने दिली. शिरूर तालुक्यात मानवावर हल्ला होण्याची घटना अधिक झाल्या आहेत.
त्यामुळे रात्रीत होणाऱ्या बिबट हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी महावितरणने दिवसा विज पुरवठा करावी अशी मागणी आंबेगाव तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केले आहे.

सवाल जाणकारांचा ?
घटना घडल्यानंतर चार दिवसात वनविभागाने एका बिबट्यांचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद केले. या भागात बिबट्यांची संख्या मोठी
असताना हा बिबट नरभक्षक कशावरून? शेतकामासाठी दिवसा विज मिळावी यासाठी आग्रह धरला जातो.हे योग्यही असू शकेल पण
शेतीत दिवसा काम करत असताना बिबट्यापासून संरक्षण कोण करणार ? शाळेतील विद्यार्थी, प्रवासी यांचा विचार होऊन
नुकसान भरपाई बरोबरच सुरक्षीततेची हमी या बाबत विचार होणे गरजेचे आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

फ्रेंडशीपसाठी नकार दिल्याने मेडीकलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण ; हडपसर परिसरातील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.