Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 29 October 2026, 16:40

पुणे : मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला अडवून 30 लाख रुपये लुटल्याचा गंभीर प्रकार घडला असताना, या घटनेची नोंद दरोड्याऐवजी ‘मिसिंग’ म्हणून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत भाऊसाहेब जगताप यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2026 रोजी मार्केटयार्ड परिसरात एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडील 30 लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने लुटून नेले होते. या गंभीर घटनेची नोंद योग्य स्वरूपात न करता ‘मिसिंग’ म्हणून करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले. दरोड्यासारखा गंभीर गुन्हा दडपण्याचा प्रकार प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सॅलसबरी पार्क परिसरात एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील साडेचार लाख रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, व्यापाऱ्याने बॅग न सोडल्याने आणि नागरिक जमा होऊ लागल्याने आरोपी पळून गेले होते. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दरम्यान, परिसरातील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर निहाल नवनाथ अडागळे (वय-19, रा. मुंढवा) आणि यश प्रवीण सोनवणे (वय-24, रा. मांजरी) या दोघांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी मार्केटयार्ड परिसरात व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला लुटून 30 लाख रुपये चोरल्याची कबुली दिल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यावेळी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद ‘मिसिंग’ म्हणून करण्यात आल्याचे उघड झाले.

दरम्यान, या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीर गुन्ह्याची योग्य नोंद न करणे, ही बेजबाबदारपणाची बाब असून, त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01

सारसबागेतील शुभम बनसोडे प्रकरणात घायवळ कनेक्शन? कारच्या मालकाबाबत समोर आली धक्कादायक माहिती..

Friday, 30 October 2026, 18:25

तिसऱ्या महायुद्धाची चाहूल की मोठं संकट? 12 देशांच्या नागरिकांना इशारा; अन्नधान्य आणि औषधांचा साठा करण्याच्या सूचना!

Friday, 30 October 2026, 17:53

राजकीय कुरघोड्यांत नेते व्यस्त; पुणे-सोलापूर महामार्ग बेवारस!

Friday, 30 October 2026, 17:34

उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात

Friday, 30 October 2026, 17:08

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा! फडणवीस सरकारने सुका चारा, मुरघासाचे दर केले निश्चित

Friday, 30 October 2026, 16:58
Next Post

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp