पुणे : मी पार 60 झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी तर 38 व्या वर्षी घेतली. वसंतदादा यांना डावलून निर्णय घेतला गेला, म्हणजे यापूर्वी निर्णय घेतले नाहीत, असं नाही. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाचा काळ असतो. वय जास्त झाल्यावर आपण घरातल्यांना म्हणतो तुम्ही आता आराम करा, मार्गदर्शन करा, आशिर्वाद द्या, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवार याचं नाव न घेता केली होती.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. 38 व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाल्या, पवार साहेबांनी 38 व्या वर्षी जो निर्णय घेतला त्याबद्दल शालिनीताईंनी सविस्तर सांगितलं होतं.
पवार साहेब राज्याचे सर्वात युवा मुख्यमंत्री झाले. सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना परिवारवादाचे लेबल लागलं नव्हतं. लोकसभेतही विरोधीपक्ष नेते झाले. बारामतीकरांना जो आशिर्वाद दिला त्यासाठी मी त्यांना अभिवादन करते. मी त्यावेळी लहान होते शालिनी पाटील सविस्तर सांगू शकतील.