गणेश सूळ..
Deputy Chief Minister Ajit Pawar : केडगाव, (पुणे) : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी गटाचा कल अजित पवारांकडे असल्याचे समोर येत आहे. सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी माजी आमदार रमेश थोरात यांना संभोधित केले की आम्ही जे काही आहोत ते तुमच्या मुळेच मग आत्ता देखिल आप्पा जिथं आम्ही तिथं असे तालुक्यतील कार्यकर्ते बोलू लागले आहेत. Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटात दौंड तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी सहभागी झाले असून, त्यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, पक्षाचे तालुकाध्यक्ष व महिला आघाडी अध्यक्षा यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात राहणे पसंत केले आहे. Deputy Chief Minister Ajit Pawar
दौंड तालुक्याचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात हे अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. दौंड शुगर लिमिटेडचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, ‘महानंद’च्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग आदी अजित पवार यांच्या गटात सहभागी आहेत. तर, पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब पवार व महिला आघाडी तालुकाध्यक्षा योगिनी दिवेकर हे शरद पवार यांच्या गटात कायम आहेत.
रमेश थोरात यांना दिले मानाचे स्थान..
मुंबईतील वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पहिल्या जाहीर बैठकीत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे व्यासपीठासमोर होते. परंतु, अजित पवार यांच्या सूचनेनुसार संयोजकांनी त्याबाबत उद्घोषणा करून थोरात यांना बोलावून व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे विभाग अध्यक्षा वैशाली नागवडे म्हणाल्या, “ज्येष्ठ नेते शरद पवार हे पितृतुल्य आहेत व राहतील. जरी अजित पवार यांच्याबरोबर मी असले, तरी माझी भूमिका शरद पवार हे वडिलकीच्या नात्याने समजून घेतील, हा दृढ विश्वास आहे. अजित पवार यांनी कायम भावासारखा भक्कम पाठिंबा दिला आहे व त्यांच्या नेतृत्वात आगामी वाटचाल राहील.”
दौंड शुगर लिमिटेडचे संचालक वीरधवल जगदाळे म्हणाले, “अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे नेतृत्व करताना पुणे जिल्हा व दौंड तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे हा निर्णय घेतला आहे.”
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले, “पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत आम्ही आहोत. पक्षाच्या स्थापनेपासून मी त्यांच्यासमवेत काम करीत आहे. माझे दिवंगत वडील तथा दौंड पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांनी देखील पवारसाहेब यांचे काम केले आहे. दोन पिढ्यांपासून काम करीत आहोत व भविष्यात देखील करणार..”
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष योगिनी दिवेकर म्हणाल्या, “शरद पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्याने आज मी पक्षाचे काम करीत आहे. महिलांना मान सन्मान व आत्मविश्वास देणारे पवार साहेब आहेत. आमचे दिवेकर कुटुंब व सासरे एकनाथ नाना दिवेकर हे साहेबांचे जुने कार्यकर्ते आहेत. आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार.. Deputy Chief Minister Ajit Pawar