Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madha News : वित्तीय संस्थांनी व्यक्तीची पत व क्षमता पाहून कर्जपुरवठा करावा – चेअरमन रणजितसिंह शिंदे..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 19:13

राजेंद्रकुमार गुंड : 

Madha News : माढा : ग्रामीण भागातील पतसंस्थेसह इतर कोणत्याही प्रकारच्या वित्तीय संस्थांच्या वृद्धीसाठी पारदर्शक कारभार व सभासदांची विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. कर्ज वाटप करताना समोरच्या व्यक्तीची पत व क्षमता पाहावी, संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामकाज करावे, अशा सूचना जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केल्या. Madha News

माढा येथे श्री संत माणकोजी महाराज ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या शुभारंभात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला करण्यात आले. त्यानंतर रणजितसिंह शिंदे यांचे वाकाव नगरीत स्वागत तोफांची सलामी देत करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘कर्जवसुली करताना कसलाही भेदभाव करू नये, संचालक मंडळानेही संस्थेच्या प्रगतीसाठी वेळ द्यावा. तसेच झालेल्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कर्जदारांनी निर्धारित वेळेत कर्जाचे हप्ते भरणे आवश्यक असते तरच कोणतीही वित्तीय संस्था नावारूपाला येऊ शकते’. Madha News :

 

ते पुढे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थी, शेतकरी, वयोवृद्ध लोक आणि महिलांना गावातच आर्थिक व्यवहार सहजासहजी करण्याच्या दृष्टीने पतसंस्था सुरू केली आहे. या माध्यमातून अनेकांच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊन मदत होणार आहे. परंतु, सर्वांनी ही संस्था आपली आहे या भूमिकेतून व्यवहार केले पाहिजेत. वाकाव येथील निष्ठावंत लोकांची वैयक्तिक व सार्वजनिक कामे प्राधान्याने केली जातील. शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासाठी शंभर टक्के सहकार्य करू’ अशी ग्वाही त्यांनी दिली. Madha News :

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, संचालक हनुमंत पाडूळे, पी. टी. काळे, चेअरमन सयाजी भुसारे, ग्रामपंचायत सदस्य माणकोजी भुसारे, भारत खंडागळे, ग्रामसेवक प्रकाश सावंत, व्हा. चेअरमन माणिक भुसारे, नगरसेवक राजू गोटे, प्रगतशील शेतकरी महेश चव्हाण, चेअरमन रमाकांत कुलकर्णी, युवानेते शंभू साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, रवींद्र चव्हाण, माणिक नागटिळक, गजेंद्र भुसारे, औदुंबर भुसारे, संतोष खोत, हरिदास भुसारे, चंद्रकांत चव्हाण, अशोक वीर, विष्णू भुसारे, रोहन कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव अमोल केसरे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्राथमिक शिक्षक संतोष भुसारे यांनी मानले.

विठ्ठलवाडीतील पतसंस्था आजही उत्तमरित्या कार्यरत..

जिल्ह्यातील अनेक पतसंस्था चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे बंद पडल्या आहेत. परंतु माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्था आजही स्पर्धेच्या युगात उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. संस्थेचे संस्थापक-चेअरमन अनिलकुमार अनभुले यांच्या कुशल नेतृत्वाखाली मागील 25 वर्षांपासून सभासद व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र राहून कामकाज चालू आहे. गावातील लोकांच्या वित्तीय गरजा व व्यवहार गावातच पूर्ण होतात याचा आदर्श इतर वित्तीय संस्थांनीही घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. Madha News :

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय रणसंग्राम! काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा अन् भाजपने दिले जशास तसे उत्तर

Friday, 31 July 2026, 16:12

अभिजित दिपकेंची राजकारणात एन्ट्री? भाजप -काँग्रेसचा अंदाज फेल ; पक्षप्रवेशाबाबत मोठा खुलासा..

Friday, 31 July 2026, 15:58

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57
Next Post

Deputy Chief Minister Ajit Pawar : दौंड राष्ट्रवादीचा कल "अजित पवारांकडेच" पहिल्याच सभेत 'माजी आमदार रमेश थोरात' यांना मानाचे स्थान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.