इंदापूर : इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांचे थोरले सुपुत्र ॲड. राहुल मखरे हे शनिवार (दि.7 सप्टेंबर 2024) रोजी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांसह दुपारी 12.30 ते 3.30 या वेळेत राष्ट्रवादी काँगेस पक्षात (शरद पवार गट) शरदचंद्र पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती गेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दस्तुरखुद अॅड. राहुल मखरे यांनी दिली.
अॅड. राहुल मखरे म्हणाले की, शरद पवार हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार कृतीतून जगणारे मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात काम करण्याची माझी इच्छा आहे. मी स्वतः शरद पवार यांना माझी इच्छा बोलून दाखवली आहे. ती त्यांनी मान्य देखील केली.
मी पद, प्रतिष्ठा आणि खुर्ची यासाठी कधीच काम केलं नाही. राजकीय आश्रयामुळे कार्यकर्त्यांचे अडलेले कामे होतात. मी पक्षप्रवेशानंतर शरद पवार व पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार आहे. असे शेवटी अॅड. राहुल मखरे यांनी सांगितले.
आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर अॅड. राहुल मखरे यांच्या शरदचंद्र पवार पक्षात होणाऱ्या पक्षप्रवेशाने तालुक्यातील राजकारणाला बळकटी मिळणार आहे.