उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील सोनाई हॉटेलच्या चौकात हायमास्ट लाईट लावण्याची मागणी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. हायमस्ट दिवा अथवा स्ट्रीट लाईटस नसल्याने दोन चार दिवसाला किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याची मागणी उरुळी कांचनचे माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, सामाजिक कार्यकर्ते ओंकार रानवडे यांनी केली आहे.
येथील स्ट्रीट लाईट व हायमास्ट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांसह वाहनचालकांचे हाल होत आहेत. याप्रकरणी ओंकार रानवडे यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. तसेच लेखी निवेदनहि दिले आहे. मात्र दोन महिने झाले तरी या ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यात आली नाही.
दरम्यान, याच चौकात असलेला पिवळा दिवा (ब्लिंकर्स) दाखवण्यापुरताच उरला आहे. मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत असून तो सुरु करण्याची मागणीही निवेदनाद्वारे रामदास तुपे यांनी केली आहे.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “दोघांनीही ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिले आहे. पिवळा दिवा सुरु करण्यासाठी संबधित विभागाला निवेदन दिले आहे. पुढील तीन ते चार दिवसात हि दोन्ही कामे केली जातील.