Aalandi News : आळंदी : इंद्रायणी नदीत बुडून एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलाच्या आईने आळंदी पोलिस ठाण्यात दिली फिर्याद
याप्रकरणी मुलाच्या आईने आळंदी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.१२) फिर्याद दिली असून मयत मुलाचे वडील विनायक धोंडीराम इप्पर (वय ३१ रा. भुगाव, मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ जून रोजी दुपारी आळंदीतील माउली मंदिर येथील इंद्रायणी घाटावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वडील यांना माहिती होते की त्यांच्या मुलाला पोहता येत नाही. तरीसुद्धा वडिलांनी मुलाला इंद्रायणी नदीपात्रात खोल घेऊन जात त्याला मध्येच सोडून वडील दुसऱ्या काठावर निघून गेले. (Aalandi News) यात मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. यावरून वडिलांवरच मुलाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे पोलीस दलातील ‘ते’ पोलीस तडकाफडकी निलंबीत
Pune News : अनाथ मुलीला धमकावून पाच वर्षे बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना