Aalandi News : आळंदी, (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी ११ जूनला प्रस्थान होणार आहे. या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना बुधवार (ता. ७) ते सोमवार (ता. १२) पर्यंत आळंदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली. (In Alandi from Wednesday, only the vehicles of Varakars will be allowed to enter; Entry ban for other vehicles – Police Inspector Sunil Godse’s information..)
प्रस्थान सोहळ्यासाठी ४ ते ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता
माऊलींचा प्रस्थान सोहळा उत्सवासाठी राज्यासह परराज्यातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Aalandi News ) त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जातात त्यांना पासची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, पाससाठी अर्ज करताना सोबत आळंदीत राहत असल्याचा पुरावा, ज्या कंपनीत काम करत आहे तेथील ओळखपत्र आवश्यक आहे.(Aalandi News ) तसेच विद्यार्थ्यांना कॉलेजचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. ६ जूनपासून पास देण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार
Pune News : मेफेनटर्माइनची अवैध विक्री; दुकानांवर एफडीए आणि पोलिसांची धडक कारवाई
Pune News : मानवतेसाठी धर्माधर्मांमध्ये संवाद वाढायला हवा : सबनीस