उरुळी कांचन, (पुणे) : किरकोळ कारणावरून उरुळी कांचन येथील एका तरुणाला पी.व्ही.सी. पाईपने दोन्ही हाताच्या दंडावर, पायाचे नडगीवर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 10) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुणे – सोलापुर हायवे रोड लगत असलेल्या ए. पी चाय. सेंटर येथे घडली आहे. याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदित्य बापु शिंदे (वय -21, रा. नंदनवन सोसायटी, शिंदवणे रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयुर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पांडुरंग कृपा, शिंदवणे रोड, ता. हवेली) याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदित्य शिंदे व त्याचा मित्र कार्तिक शितोळे हे उरुळी कांचन गावाचे हद्दीतील पुणे सोलापुर हायवे रोड लगत असलेल्या ए. पी. चाय सेंटर वरती चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी सागर गवळी व मयुर पाटील हे त्याचे मोटार सायकलवर त्याच ठिकाणी आले होते.
यावेळी शिंदे हे सागर गवळी यांचे सोबत बोलत असताना शिंदे यांनी मोटार सायकलवर लटकवलेल्या पी.व्ही.सी पाईपला हात लावला. यावेळी मयूर पाटील याने शिविगाळ करून ‘तु पाईप खाली ठेव’ असे म्हणून रागात पी व्ही सी पाईप घेवुन शिंदे यांच्या अंगावर धावून आला. यावेळी पी. व्ही. सी पाईपने शिंदे यांच्या दोन्ही हाताचे दंडावर, दोन्ही पायाचे नडगीवर, नाकावर डावे बाजुचे मानेवर मारहाण करून अपखुशीन दुखापत केली.
दरम्यान, अदित्य बापु शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मयूर पाटील याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हवालदार भुजबळ करीत आहेत.